मुरुड जंजिरा( सौ नैनिता कर्णिक) : चांद्रसेनिय कायस्थ प्रभु समाज व देवस्थान ट्रस्ट मुरुड तर्फ या वर्षीही श्री लक्ष्मीनारायण वर्धापनदिन आयोजित करण्यात आला.श्री लक्ष्मीनारायण देवतांची पूजा विश्वस्त विनय रामचंद्र मधुरे व भारती मथुरे या दापत्यांच्या हस्ते करण्यात आली.पौराहित्य मकरंद जोशी यांनी केले.
अध्यक्षा नैनिता कर्णिक, उपाध्यक्ष अशोक सबनीस,कार्यवाह संदेश मथुरे, विश्वस्त राजेंद्र पोतनीस, सुप्रिया मथुरे विनय मथुरे, माजी अध्यक्ष सुनील कुळकर्णी,उपाध्यक्ष मनोहर दिघे,कार्यवाह सुचिता पोतनीस, याच प्रमाणे हेमकांत चिटणीस, नयन कर्णिक, सुरेंद्र दिघे, साधना सबनीस, सुषमा पोतनीस साक्षी नागले, नलिनी कुळकर्णी,यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पूजारी भालचंद्र देशमुख,बालगोपाळ प्रीतेश सबनीस, रूद्र पोतनीस यांनी मोलाचे सहकार्य केले. देवतांना नैवेद्य दाखविण्यात आला. आरती नंतर अल्पोपहार देण्यात आला.अध्यक्षा नैनिता कर्णिक यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.