जालना तालुक्यातील गवळी पोखरी येथील मुस्लिम समाजाच्या एका तरुणाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या फोटोचा व्हिडीओ तयार करुन बाप तो बाप रहेगा या गाण्यावर अवमानकारक मजकुर टाकून तो सोशल मिडीयावर व्हायरल करुन अवमान केल्याची घटना दि. 13 मार्च 2023 रोजी रात्री 8 वाजेच्या सुमाराज उघडकीस आली. या घटनेमुळे हिंदु समाजाच्या तरुणांनी संताप व्यक्त केला असून आरोपीला कठोर शासन करण्याची मागणी केलीय.
आत्ता ताबडतोब हिरकणी अँप डाउनलोड करा… डाउनलोड करण्यासाठी याच जाहिरातीवर क्लिक करा…
दोन समाजात तेढ निर्माण करणाऱ्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे : शिवसेना (ठाकरे गट) युवा सेना जिल्हा प्रमुख शिवाजी शेजुळ pic.twitter.com/rkV8zsYsQP
— Hirkani News (@hirkaninews) March 13, 2023
आत्ता ताबडतोब हिरकणी अँप डाउनलोड करा… डाउनलोड करण्यासाठी याच जाहिरातीवर क्लिक करा…
छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान करणाऱ्याला तात्काळ अटक करा : अशोक पडूळ, मराठा महासंघ pic.twitter.com/tfQ37mxWxb
— Hirkani News (@hirkaninews) March 13, 2023
आत्ता ताबडतोब हिरकणी अँप डाउनलोड करा… डाउनलोड करण्यासाठी याच जाहिरातीवर क्लिक करा…
पिरकल्याण येथील काही तरुणांना इंस्टाग्रामवर रिजवान परसुवाले याच्या अकाऊंटला छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान करणारा व्हिडीओ दिसला. हा व्हिडीओ काढून टाकण्यासाठी गवळी पोखरी येथे जावून काही तरुणांनी रिजवानची समजून काढण्याचा प्रयत्न केला. आणि तो व्हिडीओ डिलीट करण्याची विनंती केली. परंंतु, रिजवान घरी नाही तो हैद्राबादला गेला आहे असे त्याचा काका शब्बीर जुम्मा परसुवाले याने तरुणांना सांगीतले. तो एवढ्यावरच थांबला नाही तर त्यानेही बाप तो बाप असतो असे म्हणून हिंदु तरुणांना मारहाण केली. तसेच इतर नातेवाईकांनाही बोलावून घेत पिरकल्याण येथील 8 ते 10 तरुणांना मारहाण केली.
त्यामुळे संतप्त तरुणांनी तालुका पोलीस ठाण्यात येवून रिजवानच्या कारणाम्याची तक्रार दाखल केली. या प्रकरणात एका जनाला पोलीसांनी ताब्यात घेतले असून मुरलीधर शिंदे यांच्या तक्रारीवरुन तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या घटनेची माहिती मिळताच शिवसेना (ठाकरे गटाचे) युवा सेना जिल्हा प्रमुख शिवाजी शेजुळ, गजानन शिंदे, अखिल भारतीय छावा संघटनेचे जिल्हा प्रमुख संदीप ताडगे, युवा जिल्हा प्रमुख मच्छिंद्र घोगरे, मराठा महासंघाचे अशोक पडूळ यांच्यासह अनेकांनी तालुका पोलीस ठाण्यात धाव घेतली. या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत कारवाई करावी व आरोपीला कठोरात कठोर शिक्षा मिळावी अशी मागणी केली. यावेळी उप विभागीय पोलीस अधिकारी निरज राजगुरु, पोलीस निरीक्षक रमेश जायभाये यांनी दखल घेत आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे.