जालना – अंबड महामार्गावरील गोलापांगरी येथील टोल नाक्याजवळ राज्य परिवहन महामंडळा च्या जाणार्या MH 20 BL 2299 या बसला बसला भिषण अपघात झाल्याने बस मधील 30 प्रवासी जखमी झाले आहेत. सदरील बस गेवराई आगाराची यात्रा स्पेशल बस आहे. यात जखमी 23 प्रवाशांना जालना येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले तर काहींना अंबडच्या उप जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
ही बस जालन्याहुन बीडकडे जात होती. गोलापांगरी टोलनाक्याजवळ अंबडकडून येणार्या जड वाहनाने हुलकावणी दिल्यामुळे बस चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. यामुळे बस रस्त्याच्या बाजूला असलेल्या खोल खड्ड्यांत जाऊन पलटली.
या बसमध्ये सुमारे 50 प्रवासी होते. या अपघातात 30 प्रवाशी जखमी झाले आहेत. यावेळी परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांनी बस मधील प्रवाशांना बाहेर काढून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात पाठविले. या अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस आणि जालना आगाराचे कर्मचारी दाखल झाले. सध्या पोलिस पंचनामा करीत आहेत. तसेच 30 जखमींवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहीती मिळताच जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अर्चना भोसले यांनी तातडीने जखमींची पाहणी करून तात्काळ उपचार करण्याचे आरोग्य आधिकारी व कर्मचार्यांना सूचना केल्यात. अपघाताची माहिती मिळताच रस्त्यावरुन जाणार्या नागरिकांनी मदत केली व घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर गर्दी देखील केली.