जालना :- आपत्तीच्या काळात जिल्ह्यात बचाव होण्यासाठी एन.डी.आर.एफ पुणे यांच्यामार्फत आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत आज दि.27 मार्च 2023 रोजी एक दिवसीय प्रशिक्षण व रंगीत तालीम आयोजित करण्यात आले होते. या प्रशिक्षणाअंतर्गत सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय जालना येथे Flood Water Rescue या विषयावर Table Top Exercise घेण्यात आली. यावेळी अपर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, , निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, तहसिलदार डॉ. प्रशांत पडघन यांची प्रमुख उपस्थिती होती.
या प्रशिक्षणात जिल्ह्यातील पोलीस विभाग, सामान्य रुग्णालय, आरोग्य विभाग (जि.प), विद्युत विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, जलसंपदा विभाग, होमगार्ड, अग्नीशमन विभाग, बी.एस.एन.एल. , म.रा.वि.वि.कंपनी, शिक्षण विभाग व महसूल विभागातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. यावेळी एन.डी.आर.एफ पुणे यांचे टिममधील अधिकारी निरीक्षक महिंद्र पुनिया व निरीक्षक अजयकुमार यादव यांनी Flood Water Rescue या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. तदनंतर दुपारी 12.30 वाजता एन.डी.आर.एफ, पुणे यांचे टिममधील अधिकारी व सहकारी कर्मचारी यांच्यामार्फत मोती तलाव, जालना येथे प्रत्यक्ष Mock Exercise घेण्यात आली. त्यामध्ये त्यांनी शोध व बचाव अंतर्गत Flood Water Rescue या आपत्तीमध्ये विविध साहित्याचा उपयोग करुन शोध व बचावाबाबत प्रत्यक्ष प्रात्याक्षिक (रंगीत तालीम) करुन दाखविले. तसेच आग लागण्याची घटनेसंदर्भातही अग्नीशमन विभागाच्या सहाय्याने प्रात्याक्षिक करण्यात आले. या Mock Exercise च्यावेळी पोलीस विभाग, आरोग्य विभाग, होमगार्ड, अग्नीशमन विभाग व महसुल विभागातील अधिकारी-कर्मचारी यांनी प्रत्यक्ष सहभाग नोंदविला. यावेळी जिल्ह्यातील पोलीस विभाग, सामान्य रुग्णालय, आरोग्य विभाग (जि.प), विद्युत विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, जलसंपदा विभाग, होमगार्ड, अग्नीशमन विभाग, बी.एस.एन.एल., म.रा.वि.वि.कंपनी, शिक्षण विभाग व महसूल विभागातील अधिकारी /कर्मचारी असे एकुण १२५ प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.