जागतिक महिला दिनानिमित्त दहिवडी कॉलेज दहिवडी च्या सर्व प्राध्यापक महिलांचा सन्मान करण्यात आला महिमानगड फाउंडेशन, अहिल्यादेवी उत्कर्ष मंडळ, नव प्रेरणा महिला मंडळ ,यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या कार्यक्रमांमध्ये महाविद्यालयाच्या उप प्राचार्य सौ नंदिनी साळुंखे डॉक्टर किरण कारंडे सौ.रेखा पवार मिनल कुलकर्णी गणेश गोडसे उपस्थित होते.
महिला दिनाचे औचित्य साधून विधवा महिलांना हळदी कुंकू लावून ओटी भरण केले या वेगळ्या उपक्रमाने सर्वच महिला आनंदूवन गेल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गणेश गोडसे यांनी केले सौ.रेखा पवार यांनी कार्यक्रमाचा उद्देश सांगितला. ज्युनियर विभागातील सर्व विद्यार्थ्यांना स्मार्ट गर्ल प्रोग्रॅम राबवण्याचे यावेळी जाहीर करण्यात आले. 13 ते 18 वयोगटातील या विद्यार्थिनींना संस्कारक्षम शिक्षण मिळण्यासाठी हे मार्गदर्शन आवश्यक आहे असे प्रतिपादन .सौ.साळुंखे यांनी केले. यावेळी काॅलेजमधील 80 प्राध्यापक महिलांचा सत्कार करण्यात आला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ.किरण कारंडे , मिनल कुलकर्णी,सौ. रेखा पवार माजी मुख्याध्यापिका कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय बिजवडी सौ.देठे यांनी परिश्रम घेतले.