धुळे – सौ. माधवी श्रीराम तेले यांना विजया लक्ष्मण काळे फौंडेशन व मराठा समन्वय परिषद महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमानाने राज्यस्तरीय राजमाता जिजाऊ पुरस्कार अहमदनगर येथे प्रदान करण्यात आला.
सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्य केल्यामुळे महिलांना राज्यस्तरीय राजमाता जिजाऊ पुरस्काराने गौरविण्यात आले.
या कार्यक्रमात धुळे एज्युकेशन सोसायटीच्या जे. आर.सिटी हायस्कूल, धुळे येथील माधवी श्रीराम तेले यांना राज्यस्तरीय पुरस्कारने सन्मानित करण्यात आले यात त्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र प्राप्त झाले. त्यांनी सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केली आहेत सदरील पुरस्कार हा मराठा समन्वय परिषद प्रभारी अध्यक्षा तथा राज्य कार्याध्यक्षा अनिताताई काळे, मुंबई येथील सामाजिक कार्यकर्त्या तथा एकल महिला पुनर्वसन समितीच्या प्रमुख विद्याताई गडाख, नोबल हॉस्पिटल्सच्या संचालिका डॉक्टर संगीताताई काडेकर, प्रतिभाताई ठाकरे , सौ. अलकाताई मुंदडा, मनिषाताई मोरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला सौ. माधवी तेले यांना मिळालेल्या पुरस्कारा बद्दल शाळेचे संस्थाचालक, पदाधिकारी , मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन व कौतुक केले तसेच समाज बांधवानी आणि त्याचप्रमाणे सर्व स्तरातून देखील सौ. माधवी श्रीराम तेले यांचे अभिनंदन व कौतुक होत आहॆ.