मुरूड जंजिरा (प्रतिनीधी,नैनिता कर्णिक) : मुरूड जंजिरा.रायगड येथील भोगेश्वर आळीतील श्री गणपती मंदिराच्या प्रांगणात लव्ह जिहाद या विषयावर जनजागृतीसाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आल प्रथम दिपाली जोशी यांनी तरूण भारत पत्रकार योगिसता साळवी यांच्या विषयी व त्याच्या कार्याची ओळख सांगितली.
तद्नंतर योगिता साळवी यांनी लव्ह जिहाद म्हणजे काय विषयी प्रतिपादन केले. काही मुली मोबाईल च्या माध्यमातून फेसबुक वरून मुलांची ओळख वाढविल्यास कोणते परिणामाला सामोरे जावे लागते धर्मांतर करण्याचीही पाळी येते याविषयी मार्गदर्शन केले. पालकांनी या बाबत कसेजागृत राहणे राहणे गरजेचे आहे हे उदाहरणासह स्पष्ट केले.
यावेअळी संघ परिवारातील दिलीप जोशी,अनुप सर,संजय ठाकुर, अंकूर गोबरे,अॅड मृणाल खोत माजी नगरसेविका युगंधरा ठाकुर डाॅक्टर रविंद्र नामजोशी,उर्मिला नामजोशी समीधा उपाद्दे , अस्मिता पेंडसे महिला ,पालक,विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रम खेळीमेळीत संपन्न झाला.जोशी बाई यांनी योगिता साळवी यांनी उत्तम मार्गदर्शन केल्याबद्दल व सर्व उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.