माण-खटाव सारख्या दुष्काळग्रस्त भागात ,हरित वसुंधरा फुलवणारा खरा बागवान,महसूल व्यवस्थेतील उत्तम प्रशासक ,समाजातील सर्व स्तरातील लोकांना सांधणारा दुवा,जन मनात आपले अढळ स्थान निर्माण करणारा ध्रुव तारा… आपल्या सर्वांचे लाडके ,आवडते,लोकप्रिय व्यक्तिमत्व माण-खटाव चे उपविभागीय अधिकारी श्री शैलेश सूर्यवंशी यांचा निरोप समारंभ 15 एप्रिल रोजी अगदी थाटात साजरा झाला .हरित वसुंधरा टीम ,दहिवडी शिंगणापूर, वडूज ,माण-खटाव मधील प्रांतसाहेब प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.अगदी प्रेमाने ,उत्साहाने प्रत्येक क्षण आनंदात साजरा झाला .साहेबांची धुमधडाक्यात जंगी मिरवणूक काढण्यात आली .फटाक्यांची आतषबाजी, ढोलताशांच्या गजरात ,सिद्धनाथ मंदिरापासून मिरवणूकीला सुरवात झाली .प्रमुख अतिथींचे स्वागत झाले. कारंडे काका,खोत काका,संदीप खाडे सर,जठार सर ,भदाणे सर,प्रांत कार्यलयातील सर्व कर्मचारी,तसेच माझी मुलगी अनुष्का निकाळजे (जी साहेबांशी नेहमी वेगवेगळ्या विषयांवर मनमुक्त संवाद साधायची)सर्वजण साहेबांची आतुरतेने वाट बघत होते.
काहीच क्षणात प्रांतसाहेबांचे आपल्या कुटुंबियांसोबत आगमन झालं.तो क्षण प्रत्येकासाठी अविस्मरणीय असणार नक्कीच! नेहमीप्रमाणे साहेबांनी सर्व उपस्थित जनसमुदायास नमस्कार घातला ,वाजत गाजत साहेबांना सिध्दनाथाच्या मंदिरात दर्शनासाठी नेण्यात आलं.तिथूनच मिरवणुकीची सुरवात झाली तो क्षण ,ते वातावरण जसं भारावून टाकणारं होतं तेवढंच हृदयद्रावक सुध्दा!
आता ते शब्दांत मांडणं कठीण ! वाजत गाजत मिरवणूक पुढं पुढं चालली होती . तेवढ्यात मी आणि अनुष्का घरी आलो कारणही तसच होतं माझ्या छोट्या मुलीचा वाढदिवस होता आवराआवर करण्यासाठी मला घरी यावं लागलं. वाढदिवसाची तयारी केली आणि पुन्हा मी हरित वसुंधरा मैदानावर गेले .आणि साहेबांच्या स्वागतासाठी तिथंच थांबले
साहेबांची बदली होऊन ते जाणार आहेत या कल्पनेनं दुःख ही वाटत होतं पण शेवटी प्रशासकीय सेवा आहे .कधीतरी त्यांची बदली होणार हे सहाजिकच होतं.त्यामुळं जास्त विचार न करता निरोपाचा क्षण ही आनंदाने साजरा करायचा असं मनोमन ठरवलं .साहेबांची Gypsy प्रांत ऑफिस च्या गेट वर येताच एक वेगळाच आनंद ….! अत्यंत भावुक क्षण … ! साहेबांसोबत त्यांच्या Gypsy मध्ये उभं राहून मस्तपैकी आम्ही प्रांत ऑफिस पर्यंत वाजत गाजत आलो ,अडीज वर्ष साहेबांच्या सहवासात खूप काही शिकायला मिळालं .प्रचंड बळ मिळालं ,सकारात्मक ऊर्जा मिळाली ,त्यामुळं कधीही एकटं वाटलं नाही खूप मोठी ताकत आपल्या सोबत आहे याची खात्री त्यांनी कायम दिली. त्या सर्व आठवणी आज डोळ्यासमोर रुंजी घालत होत्या.खूप काही शिकल्याचा आनंद तर होताच पण माझे गुरू आता फक्त आठवणीत असतील याचंही दुःख मनाला टोचत होतं, तरीही मन घट्ट करून साहेबांना आनंदाने शुभेच्छा दिल्या.
प्रांतसाहेबांनी ‘ हरित वसुंधरा’ च्या रूपात माण -खटाव ला एक संजीवनी देण्याचं काम पूर्णत्वास नेण्यासाठी आपल्या 23 वर्षांतील प्रशासकीय अनुभव पणास लावला होता ,आपलं सगळं कौशल्य वापरलं होतं…….आणि त्यांचं कष्ट फळाला आलं हरित वसुंधरा परिसर बहरून आला.सगळीकडे हिरवळ,केव्हाही इथं यावं या सर्वांशी बोलावं ,निसर्गात रमावं ,पक्ष्यांचा आवाज ऐकावा ,फेरफटका मारावा, उगवणारा सूर्य बघावा ,तेवढ्याच शांततेत मावळणारा सूर्यही बघावा , सर्व प्रकारची झाडे,फळांची,फुलांची ,औषधी वनस्पती, ऑक्सिजन देणारी झाडे आणि म्हणूनच साहेबांनी हरित वसुंधरा ,प्रांत ऑफिस च्या प्रांगणात मनमुराद आनंद घेतला अगदी मनापासून आज निरोपाचा दिवस तो विसरून , आज आताचा क्षण जल्लोषात साजरा केला …साहेब स्वतः नाचू लागले मलाही राहवले नाही, मी सुध्दा नाचले, आनंद !आणि फक्त आनंद, उपस्थित सर्व प्रांतसाहेब प्रेमींनी वाजत ,गाजत ,नाचत आपल्या साहेबांसोबत प्रत्येक क्षणाचा आनंद घेतला ,अगदी मनमुराद ,सर्वजण भान हरपून गेले होते. साहेबांसोबत running चा एक round पूर्ण केला. हरित वसुंधरा टीम कारंडे काका, खोत काका, खाडे सर जठार सर भदाणे सर पालवे डॉक्टर ,बोराटे डॉक्टर, कर्णे डॉक्टर, बाबा, अजय मतकर आम्ही सर्वांनी मिळून आमच्या नेहमीच्या ठिकाणी साहेबांसोबत फोटो काढले .खरतर खूप मजा आली हे क्षण पुन्हा कधी येतील माहीत नाही पण आहेत ते अविस्मरणीय आहेत एवढं नक्की! साहेबांनी आपल्या हरित वसुंधरा मैदानावरील झाडांची खूप प्रेमाने गळाभेट घेतली आणि जणूकाही ते झाडांना मायेने गोंजारत त्यांचा निरोप घेत होते.
साहेबांच्या डोळ्यात त्या हरित वसुंधरेविषयी आपुलकी, माया, लळा आणि जिव्हाळा आणि सोबतच माण च्या मातीशी झालेले ऋणानुबंध सारं काही डोळ्यातून ओसांडून वाहत होतं “ऐसा अधिकारी पुन्हा होणे नाही!”अगदी मनापासून सांगते. खुर्ची सोडून काम करणारा, सामान्य माणसांना सामावून घेणारा ,प्रत्येकातील चांगलं शोधणारा राजहंस अशा उमद्या अधिकाऱ्यास कोणी कधीच विसरू शकणार नाही चंदनासारख्या त्यांच्या आठवणी सदैव दरवळत राहतील.
हा निरोप समारंभ नव्हता तो अविस्मरणीय सोहळा होता. जिथं प्रमुख अतिथी कुणी मोठा नव्हता तर प्रत्येक सामन्यातील सामान्य माणूस होता हीच साहेबांची खरी कमाई लोकांचं प्रेम,आणि प्रत्येक सामान्य माणसाच्या हृदयात त्यांनी मिळवलेली जागा ! आणि ती कायम राहणार ..लोक आपल्या भाषणात त्यांना शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न करत होते पण खरच कोणालाच ते शब्दांत मांडता येत नव्हते. असे साहेबांचे व्यक्तिमत्व साहेब तुम्ही कुठेही असा तुमचं कार्य नेहमीच अजरामर ठरणार, तुमच्या आठवणी आम्ही हृदयात कायम जपणार,तुमच्या शिकवणुकीची शिदोरी मला कायम प्रेरणा देत राहील. असेच पुढे चालत रहा, माणसाला माणूस जोडत रहा ,अनेक कल्याणकारी कार्य आपल्या हातून घडत राहो, सर्वांचे आशीर्वाद आणि सदिच्छा आपणास मिळत राहो आपणास सेवेत बढती मिळो !आपला आनंद कायम द्विगुणित होवो !विजयी भव! वरील लेखनप्रपंच , प्रांताधिकारी श्री शैलेश सुर्यवंशी यांच्या अविस्मणीय आठवणींस अर्पण
लेखिका सौ.विद्या सुरजकुमार निकाळजे
हरित वसुंधरा टीम दहिवडी , सदस्य
अष्टभुजा हिरकणी साप्ताहिक (कार्यकारी संपादक)
अध्यक्ष, अष्टभुजा फौंडेशन