Friday, April 17, 2026
सभासद नोंदणी
Hirkani News
Advertisement
  • होम
  • E-paper
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
      • जालना – छत्रपती संभाजीनगर
      • अहमदनगर – बीड
      • मुंबई – नवी मुंबई
      • ठाणे – पालघर
      • पुणे – सातारा
      • सोलापूर-धाराशिव
      • नांदेड – परभणी
  • क्राइम
  • राजकारण
  • साहित्य
    • कथा
    • कविता
    • लेख
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • इतर बातम्या
    • क्रीडा
    • व्यापार / उद्योगधंदे
    • कृषी
    • विज्ञान
    • तंत्रज्ञान
  • संपादकीय
  • लाईफस्टाईल
    • आरोग्य
    • फूड
    • फॅशन
    • रेसिपीज
    • ट्रॅव्हल
    • मनोरंजन
  • सभासद नोंदणी
TV News
E-Paper
No Result
View All Result
  • होम
  • E-paper
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
      • जालना – छत्रपती संभाजीनगर
      • अहमदनगर – बीड
      • मुंबई – नवी मुंबई
      • ठाणे – पालघर
      • पुणे – सातारा
      • सोलापूर-धाराशिव
      • नांदेड – परभणी
  • क्राइम
  • राजकारण
  • साहित्य
    • कथा
    • कविता
    • लेख
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • इतर बातम्या
    • क्रीडा
    • व्यापार / उद्योगधंदे
    • कृषी
    • विज्ञान
    • तंत्रज्ञान
  • संपादकीय
  • लाईफस्टाईल
    • आरोग्य
    • फूड
    • फॅशन
    • रेसिपीज
    • ट्रॅव्हल
    • मनोरंजन
  • सभासद नोंदणी
No Result
View All Result
Hirkani News
No Result
View All Result
  • होम
  • E-paper
  • महाराष्ट्र
  • क्राइम
  • राजकारण
  • साहित्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • इतर बातम्या
  • संपादकीय
  • लाईफस्टाईल
  • सभासद नोंदणी
Home साहित्य लेख

 प्रदूषणावर वेळीच नियंत्रण आणले नाही तर मोठा धोका उद्भवू शकतो सावधान

हिरकणी टीम by हिरकणी टीम
December 1, 2023 2:29 PM
A A
 प्रदूषणावर वेळीच नियंत्रण आणले नाही तर मोठा धोका उद्भवू शकतो सावधान
103
VIEWS

  औद्योगिक क्षेत्रासह संपूर्ण क्षेत्रातील प्रदूषणावर नियंत्रण असने अती आवश्यक आहे.कारण भारतातील प्रदुषणाची पातळी दिवसेंदिवस वाढत आहे.औद्योगिक तसेच वैयक्तिक पातळीवर प्रदूषणाने अनेक ठिकाणी धोक्याची पातळी ओलांडल्याचे दिसून येते व यामुळे गंभीर परिणाम सुध्दा होतांना आपण पहातो.याचा विपरीत परिणाम मानव, पशु-पक्षी,जीव-जंतु, जीवसृष्टी, नैसर्गिक संसाधने, आणि हवामानावर होत आहे.यामुळेच आज आपल्याला स्थल,जल, वायू या तिन्ही ठिकाणी प्रदूषणाचा धोका वाढल्याचे दिसून येते.२ डिसेंबर १९८४च्या रात्री भोपाळ जवळील युनियन कार्बाईडच्या कारखान्यातून विषारी वायू गळती होऊन हजारो लोक मृत्युमुखी पडले.हा दिवस भारतसह जगासाठी काळीमा फासणारा ठरला.या दुर्घटनेची आठवण विशेषतः औद्योगिक क्षेत्रासाठी आणि यापुढे अशा घटना घडू नये यासाठी सर्वांनीच काळजी घ्यावी म्हणून २ डिसेंबर हा दिवस भारतात “राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस” म्हणून पाळला जातो.जगातील औद्योगिक क्षेत्रातील प्रदूषणाशी संबंधित दुर्घटनांमध्ये भोपाळ वायू दुर्घटना सर्वात भीषण आणि महाभयानक समजली जाते.

अशाच प्रकारच्या दोन घटना अमेरिकेतील थ्री माईल आयलॅड (१९७९) आणि रशियातील चेर्नोबिल (१९८६) या औद्योगिक क्षेत्रातील भयावह घटना घडल्या होत्या.म्हणजेच पृथ्वीसह संपूर्ण जीवसृष्टीला प्रदूषण विनाशाकडे नेतांना दिसत आहे.मानव हा बुध्दीजीवी प्राणी आहे त्यामुळे मानवच  प्रदूषणावर नियंत्रण ठेवु शकतो.नद्यांच्या काठावर मानवी संस्कृती विकसित झाली.पुढे त्या मानवाच्याच साक्षीने त्या-त्या पध्दतीने सांस्कृतिक धरोहर घोषित करण्यात आली.परंतु ज्या नद्यांच्या काठावर मानवाने आपले वास्तव्य बनवीले त्या नद्यांमध्ये दुषीत पाण्याचा लोंढा आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसुन येतो.पाण्याच्या दृष्टीकोनातून नद्यांच्या अवतीभवती मोठमोठी गावे वसायची व त्या नद्यांच्या पाण्याचा उपयोग शेतीच्या कामासाठी व पीण्याच्या पाण्यासाठी केला जात असे.परंतु आता परीस्थिती बदलेली दिसून येते.सध्याच्या परिस्थितीत नद्यांच्या अवतीभवती मोठमोठी औद्योगिक वसाहत पहायला मिळते.याच औद्योगिक क्षेत्रातील दुषीत पाणी नदीत सोडल्या जाते.त्यामुळे आपल्याला आजही अनेक मोठमोठ्या नद्या प्रदुषणाचा गंभीर मार झेलतांना दिसतात आणि यामुळे त्यांच्या आजूबाजूचा संपूर्ण परीसरात प्रदूषित झालेला दिसुन येतो.प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या सर्वेमध्ये असे लक्षात आले की देशातील प्रमुख नद्यांच्या १५० टापू प्रदूषीत असल्याचे सांगितले आहे.म्हणजेच नदि-नाले,तलाव, हवेतील वातावरण हे संपूर्ण प्रदुषणाकडे मोठ्या प्रमाणात वाटचाल करताना दिसत आहेत.याला मानवाने ताबडतोब रोखले पाहिजे अन्यथा अनर्थ होऊ शकतो.आज भारताची राजधानी दिल्ली प्रदुषणाचे माहेरघर बनली आहे.कारण कधी-कधी प्रदुषणाचे प्रमाण एवढे वाढुन जाते की शाळांना सुट्टी द्यावी लागते.कारण हिवाळ्यामध्ये वायू प्रदूषण अत्यंत धोकादायक स्थितीत येवून ठेपते.देशातील प्रदुषण फटाक्यांनी वाढते ही चुकीची कल्पना आहे.देशातील प्रदुषणामध्ये वाढ मुख्यत्वेकरुन औद्योगिकरण व वाहनांच्या दुषित धुरामुळे मोठ्या प्रमाणात होत आहे.

फक्त दिवाळीचे एक-दोन दिवस फटाक्यांमुळे प्रदुषणात वाढ होते.त्याला फटाक्यांमुळे प्रदुषण झाले असे म्हणता येणार नाही.आज भारत प्रदुषणाच्या बाबतीत जगात आठव्या क्रमांकाचा प्रदुषित देश म्हणून गणना होते ही अत्यंत गंभीर व चिंताजनक बाब आहे.भारतात प्रदुषण ही एक मोठी समस्या असुन भारतीय शहरात सरासरी पार्टिक्युलेट मॅटर(पीएम कण)२.५ हे ५३.३ मायक्रोग्रॅम आढळले.हे प्रमाण जागतिक आरोग्य संघटनेच्या सुरक्षित मर्यादेपेक्षा १० पट अधिक आहे.हा अहवाल स्वित्झर्लंडची संस्था आयक्यू एअरने दिनांक१४ मार्च २०२३ रोज मंगळवारला”वर्ल्ड एअर क्वॉलिटी रिपोर्ट”(जागतिक वायू गुणवत्ता अहवाल) नावाचा आपला अहवाल प्रसिद्ध केला.यावरून आपण समजू शकतो की प्रदुषणाच्या बाबतीत भारत अत्यंत गंभीर व धोकादायक स्थितीत आहे.जगातिल टॉप १०० सर्वाधिक प्रदूषित शहरांपैकी ६५ शहरे एकट्या भारतातील आहेत.यात मुख्यत्वे करून दरभंगा, आसोपूर, पाटणा,नवी दिल्ली, कोलकाता,मुंबई,हैद्राबाद,बंगळूरु, चेन्नई यांचा समावेश आहे.त्यामुळे प्रदूषणाच्या बाबतीत भारताची चिंता दिवसेंदिवस वाढतच आहे.वाढत्या प्रदुषणाचे मुख्य कारण म्हणजे वाढते औद्योगिकीकरण, शहरीकरण, जंगलकटाई, सांडपाणी, मोठ्या प्रमाणात वाहनांचे आवागमन, हवाई वाहतूक इत्यादींमुळे आज पृथ्वीतलावरील संपूर्ण जीवसृष्टीला धोका निर्माण झाला असून भयभीत आहे व यामुळे सर्वांचेच जगने अत्यंत कठीण झाले आहे.परंतु २ डिसेंबर राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस या निमित्ताने सर्वांनीच प्रदूषणावर नियंत्रण आणण्याचा संकल्प केला पाहिजे.जी-२० परिषदेत सुध्दा जागतिक स्तरावर प्रदुषण नियंत्रणावर मोठ्या प्रमाणात चर्चा करण्यात आली.देशातील शहरीकरण रोखने, औद्योगिकरणावर नियंत्रण ठेवणे, भारतात सरकारी वाहने प्रदुषित धुळ जास्त ओकतात यावर अंकुश लागायला हवा.व देशातील जंगलतोड ताबडतोब थांबवून मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड व्हायला पाहिजे.तेव्हाच आपल्याला प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यात यश प्राप्त होईल.अन्यथा गंभीर धोका निर्माण होऊ शकतो याला नाकारता येत नाही.

 – रमेश कृष्णराव लांजेवार                            

Previous Post

छगन भुजबळ गो बॅक!; छगन भुजबळ यांचा ताफा जाताच मराठा आंदोलकांनी गोमुत्र शिंपडलं

Next Post

माजी मंत्री राजेश टोपेंच्या कारवर हल्ला; दगडफेक झाली, काळं फासण्याचा प्रयत्न

हिरकणी टीम

हिरकणी टीम

अष्टभुजा हिरकणी हे महिलांनी महिलांसाठी सुरू केलेलं महाराष्ट्रातील महिलांचे पहिलेच मुखपत्र अष्टभुजा हिरकणी हे वृत्तपत्र आहे. याच वृत्तपत्राने आता डिजिटल युगात भरारी घेत अधिकृत हिरकणी न्यूज पोर्टल, युट्युब चॅनल तयार केले आहे. या माध्यमातून देशातील प्रत्येक भागात माहितीचा प्रचार आणि प्रसार करुन जनजागृती चे मौल्यवान कार्य सुरू करण्यात आले आहे. हिरकणी हे महाराष्ट्रातील पहिले महिलांचे मुखपत्र आहे. महिलांनी अधिकृत नोंदणी करुन साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी हे वृत्तपत्र चालवित आहे. हे वर्तमानपत्र सोशल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रभर वाचले जाते. सुमारे 1 लाखाहून अधिक हिरकणी चे वाचक आहेत आणि यात महिला वाचकांची संख्या अधिक आहे. हिरकणीचे अधिकृत फेसबुक, ट्वीटर, इंस्टाग्राम चे सोशल अकाऊंट्स आहेत. संपर्क : 9850516724 मेल आयडी : hirkaninews@gmail.com वेब : www.hirkani.in

Related Posts

पुन्हा नव्याने सुरुवात कर
कविता

पुन्हा नव्याने सुरुवात कर

March 8, 2024
118
महिला दिन विशेष : शासकीय योजनांतून महिलांचे सशक्तीकरण…
महाराष्ट्र

महिला दिन विशेष : शासकीय योजनांतून महिलांचे सशक्तीकरण…

March 7, 2024
146
अवर पीपल
लेख

अवर पीपल

January 24, 2024
109
कौमुदी पौर्णिमा
लेख

कौमुदी पौर्णिमा

October 27, 2023
200
कथा एका पोस्टमन दादाची
कथा

कथा एका पोस्टमन दादाची

October 9, 2023
223
महान सुप्रसिद्ध कृषी शास्त्रज्ञ डॉ.एम.एस. स्वामीनाथन
लेख

महान सुप्रसिद्ध कृषी शास्त्रज्ञ डॉ.एम.एस. स्वामीनाथन

October 4, 2023
112
Next Post
माजी मंत्री राजेश टोपेंच्या कारवर हल्ला; दगडफेक झाली, काळं फासण्याचा प्रयत्न

माजी मंत्री राजेश टोपेंच्या कारवर हल्ला; दगडफेक झाली, काळं फासण्याचा प्रयत्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

I agree to the Terms & Conditions and Privacy Policy.

संपर्कात राहा

Follow

  • Trending
  • Comments
  • Latest
जालना जिल्ह्यातील शिक्षीकेचा भयानक प्रताप; डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी गोवर्‍या खावून अभ्यास केल्याचे केले वादग्रस्त विधान

जालना जिल्ह्यातील शिक्षीकेचा भयानक प्रताप; डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी गोवर्‍या खावून अभ्यास केल्याचे केले वादग्रस्त विधान

February 12, 2024
जालन्यात पुन्हा एक खून… वाढदिवसाच्या पार्टीत झालेल्या वादातून चाकूने भोसकून खून; शहरात खळबळ

जालन्यात पुन्हा एक खून… वाढदिवसाच्या पार्टीत झालेल्या वादातून चाकूने भोसकून खून; शहरात खळबळ

February 4, 2024
Vedeo : धक्कादायक : मृत्युनंतरही सुरु होते उपचार; जिल्हा सामान्य रुग्णालयात डोळ्याच्या ऑपरेशनसाठी आलेल्या महिलेचा मृत्यु

Vedeo : धक्कादायक : मृत्युनंतरही सुरु होते उपचार; जिल्हा सामान्य रुग्णालयात डोळ्याच्या ऑपरेशनसाठी आलेल्या महिलेचा मृत्यु

December 29, 2022
Video-जालना तालुक्यातील सोनदेव येथे फराळातून शेकडो भक्तांना विषबाधा

Video-जालना तालुक्यातील सोनदेव येथे फराळातून शेकडो भक्तांना विषबाधा

April 6, 2024
Video : वाह रे पठ्या… प्रशासनाला हरविणारा जालन्याचा हा अवलिया तुम्ही पाहिलाय का? पालिका प्रशासनाने आंदोलनकर्त्याच्या मागण्या केल्या पुर्ण

Video : वाह रे पठ्या… प्रशासनाला हरविणारा जालन्याचा हा अवलिया तुम्ही पाहिलाय का? पालिका प्रशासनाने आंदोलनकर्त्याच्या मागण्या केल्या पुर्ण

1
जीवरेखा धरणातून शेतीसाठी पाणी सोडण्याची शेतक-याची मागणी; पाटबंधारे विभागाला दिले निवेदन

जीवरेखा धरणातून शेतीसाठी पाणी सोडण्याची शेतक-याची मागणी; पाटबंधारे विभागाला दिले निवेदन

0

Hands on: Samsung Galaxy A5 2017 review

0

The Last Guardian Playstation 4 Game review

0
हैदराबाद गॅझेटच्या आधारे बंजारा व धनगर समाजाला एसटी आरक्षण द्या

हैदराबाद गॅझेटच्या आधारे बंजारा व धनगर समाजाला एसटी आरक्षण द्या

December 14, 2025
जालना-मंठा रोडवर चारचाकीची जोरदार धडक; पिरकल्याण प्रकल्पातील पांडुरंग गायकवाड यांचा जागीच मृत्यू

जालना-मंठा रोडवर चारचाकीची जोरदार धडक; पिरकल्याण प्रकल्पातील पांडुरंग गायकवाड यांचा जागीच मृत्यू

December 13, 2025
कंत्राटदार व अधिकार्‍यांनी शेकडो कोटींची फसवणूक केल्याचा आमदार बबनराव लोणीकर यांचा आरोप

कंत्राटदार व अधिकार्‍यांनी शेकडो कोटींची फसवणूक केल्याचा आमदार बबनराव लोणीकर यांचा आरोप

December 13, 2025
छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांच्या हस्ते उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या अधिकारी-अंमलदारांचा गौरव

छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांच्या हस्ते उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या अधिकारी-अंमलदारांचा गौरव

December 13, 2025

चालू घडामोडी

हैदराबाद गॅझेटच्या आधारे बंजारा व धनगर समाजाला एसटी आरक्षण द्या

हैदराबाद गॅझेटच्या आधारे बंजारा व धनगर समाजाला एसटी आरक्षण द्या

December 14, 2025
104
जालना-मंठा रोडवर चारचाकीची जोरदार धडक; पिरकल्याण प्रकल्पातील पांडुरंग गायकवाड यांचा जागीच मृत्यू

जालना-मंठा रोडवर चारचाकीची जोरदार धडक; पिरकल्याण प्रकल्पातील पांडुरंग गायकवाड यांचा जागीच मृत्यू

December 13, 2025
110
कंत्राटदार व अधिकार्‍यांनी शेकडो कोटींची फसवणूक केल्याचा आमदार बबनराव लोणीकर यांचा आरोप

कंत्राटदार व अधिकार्‍यांनी शेकडो कोटींची फसवणूक केल्याचा आमदार बबनराव लोणीकर यांचा आरोप

December 13, 2025
103
छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांच्या हस्ते उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या अधिकारी-अंमलदारांचा गौरव

छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांच्या हस्ते उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या अधिकारी-अंमलदारांचा गौरव

December 13, 2025
104
  • होम
  • E-paper
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
      • जालना – छत्रपती संभाजीनगर
      • अहमदनगर – बीड
      • मुंबई – नवी मुंबई
      • ठाणे – पालघर
      • पुणे – सातारा
      • सोलापूर-धाराशिव
      • नांदेड – परभणी
  • क्राइम
  • राजकारण
  • साहित्य
    • कथा
    • कविता
    • लेख
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • इतर बातम्या
    • क्रीडा
    • व्यापार / उद्योगधंदे
    • कृषी
    • विज्ञान
    • तंत्रज्ञान
  • संपादकीय
  • लाईफस्टाईल
    • आरोग्य
    • फूड
    • फॅशन
    • रेसिपीज
    • ट्रॅव्हल
    • मनोरंजन
  • सभासद नोंदणी

© 2024 हिरकणी - All Rights reserved.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.

Visitors

N/A

हिरकणी आवृत्ती : जालना, सातारा, रायगड, अहमदनगर, सोलापूर, पालघर, मुंबई, ठाणे, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, बीड

आमच्या बद्दल

11hirkani

Your Digital Partner

महिलांचे पहिले मुखपत्र म्हणून ओळख असलेले आणि अल्पावधीतच महाराष्ट्रातील तमाम मराठी महिला वाचकांच्या पसंतीस उतरलेले व वाचकांच्या प्रेमामुळे लोकप्रिय झालेले मराठी वृत्तपत्र साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी हे 2020 मध्ये सुरु झाले… Read more

संपर्क तथा तक्रार अधिकारी

मोबाईल नं. : +91 9850516724
इ-मेल : hirkaninews@gmail.com

Quick Links

Menu
  • About Us
  • Terms and Conditions
  • Privacy-Policy
  • Advertise with us
  • Subscribe

डाउनलोड करा हिरकणी ॲप

google-play-badge

Follow us

आमचे पार्टनर

इंडीयन फास्ट

उज्वल बहुउद्देशीय सेवाभावी संस्था

शेतकरी कॉर्नर

कल्याणम वधु वर सुचक केंद्र

© 2024 हिरकणी - All Rights reserved.