सातारा हिरकणी(विदया निकाळजे) – जागतिक हिवताप दिनानिमित्त सातारा शहरातून प्रभातफेरी काढून जनतेमध्ये जनजागृती करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा हिवताप अधिकारी श्रीमती अश्विनी जंगम यांनी दिली. यावेळी आरोग्य सेवा (हिवताप) पुणे येथील सहाय्यक संचालक प्रतापसिंह सारणीकर, जिल्हा हिवताप अधिकारी श्रीमती अश्विनी जंगम, जिल्हा रुग्णालयातील श्रीमती तृप्ती राजे, आरोगय परिचारिका स्मिता भोसले तसेच आरोग्य सेविका प्रशिक्षणार्थी व जिल्हा हिवताप कायार्लयातील कर्मचारी उपस्थित होते.
प्रभातफेरीचे उद्घाटन डॉ. सारणीकर यांच्या हस्ते करण्यात आले. प्रभातफेरीमध्ये घराच्या सभोवती असणारे खड्डे बुजविणे, इमारतीवरील टाक्या, हौदाची झाकणे घट्ट बसविणे, घराभोवतालची रांजण, बॅरल, हौद इ. पाण्याचे साठे झाकून ठेवणे, आठवड्यातून एकदा कोरडा दिवस पाळणे, घरातील कुलर, फुलदाण्या वेळीच स्वच्छ करणे, मोठ्या पाण्याच्या साठ्यामध्ये डास अळी भक्ष्क गप्पी मासे सोडणे इत्यादींची जनतेमध्ये जनजागृती करण्यात आली. तसेच तालुका स्तरावर, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र या ठिकाणीही हा कार्यक्रम राबविण्यात आला असल्याची माहिती श्रीमती जंगम यांनी दिली.