दिनांक २४ एप्रिल २०२३ रोजी जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूट संस्थेचा १३२वा वर्धापन दिन शिक्षणप्रसारक कै. गो. ना. अक्षीकर विद्यासंकुल, उरण,या संकुलातील प्राथमिक शाळा, बोकडविरा या शाळेत निसर्गरम्य वातावरणात अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून आशिषकुमार केदार (व्यक्तिमत्त्व विकास व करियर कॉउन्सलर) , मुकेश बागिले(सहज योग ध्यानधारणाचे प्रेरक), वाघ (म.रा.वि.म.चे अधिक्षक अभियंता) हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षपद जएइ’चे संचालक मंडळ सदस्य व शालेय समिती अध्यक्ष श्री. सदानंद गायकवाड यांनी स्विकारले. तसेच माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री. कोठावदे सर, प्राथ. शाळा मराठी माध्यम व इंग्रजी माध्यमाच्या मुख्याध्यापिका सौ.नारखेडे मॅडम, सौ. कवळसे , सौ. पाटील तसेच संकुलातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी कार्यक्रमास उपस्थित होते.