उरण रायगड(तृप्ती भोईर) – दि. २८ एप्रिल रोजी शिरढोण हायस्कूल येथे पार पडलेल्या सेवानिवृत्ती च्या कार्यक्रमात सु.ए.सो.पालीचे मानद सचिव रविकांत घोसाळकर साहेब,व उपस्थित मान्यवर आदरणीय मोकल सर यांच्या सेवानिवृत्त कार्यक्रमात उपस्थित राहून मोठ्या दिमाखात कार्यक्रम पार पडला.
लेझीम व वाद्यवृंदाच्या तालावर सत्कारमूर्ती मोकल सरांंची भव्यदिव्य मिरवणूकी समवेत आगमन झाले. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन व दिपप्रज्वलन करुन करण्यात आली. सुंदर ईशस्तवन व स्वागत गीतानंतर आलेल्या मान्यवरांचे स्वागत व पाहुण्यांचा अल्पशब्दांत मापरे नी परिचय करून दिला. कार्यक्रमाची उत्सवमूर्ती त्यांनी प्रकाशित केलेल्या लघुनाटीकेचे प्रकाशन अध्यक्षांच्या हस्ते करण्यात आले. विद्यार्थी मनोगतातून मुग्धा मुकादम हिने उत्कृष्ट वक्तृत्व व भावनाप्रधान शब्दांत आपले मनोगत सादर केले. माजी मुख्याध्यापक अजय पाटील सर, गायकवाड, डी.के.पाटील, मुख्याध्यापक सोनावणे, राम भोईर, मोकलचे नातेवाईक व मित्र यांनी अतिशय सुंदर अशा शैलीत आपले विचार व्यक्त केले. यावेळी मोकलच्या कुटुबियांनाही गौरविण्यात आले. तीनविरा हायस्कूल चे शिपाई सोनावणे यांनी तर आपल्या गीतांमधून मोकल सरांच्या कार्याचा आढावा मांडुन ते ऐकताना सर्वांचेच डोळे पाणावले. यावेळी सत्कार मुर्ती मोकलनीही आपल्या भावना अल्पशब्दांत मांडल्या. कार्यक्रमाचे सुत्रसंचलनाची जबाबदारी गायकरनी उत्तमरित्या पार पाडली.
कार्यक्रमाच्या शेवटी आभार मानण्यात आले. यावेळी सर्वांना स्वादिष्ट जेवणाची व्यवस्था ही करण्यात आली होती. सेवानिवृत्ती कार्यक्रम म्हणजे ” मनाला चटका लावणाराच कार्यक्रम” असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही.
कार्यक्रमात उपस्थित असणारे मुख्याध्यापक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आदी़च्या मेहनतीने कार्यक्रमास रंगत आली कार्यक्रमात उपस्थित आजीमाजी विद्यार्थी , मोकलचे आप्तीय ईत्यादीं च्या उपस्थीतीने कार्यक्रमास शोभा आली. पुन्हा एकदा सत्कारमूर्ती मोकल नी सर्वांचेच आभार मानले. मोकलना मिरवणुकीत आपल्या घरी नेण्यात आले.