उरण रायगड(तृप्ती भोईर) – केंद्रीय विद्यालय एन.ए.डी.उरण शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी आपल्या शाळेचे क्रिडाप्रकारात नाव उज्ज्वल केले आहे. शाळेत घेतल्या गेलेल्या विभागीय क्रिडा स्पर्धेत प्रथम विजेतेपद सांघीक लेव्हल मध्ये कर्णधार अशिष कुमार याची निवड झाली आहे मुंबई विभागीय संघामध्ये अशिष कुमार या विद्यार्थ्याची हि निवड दुसऱ्यांदा होत आहे.
यापुर्वीही अशिषची निवड नॅशनल लेवलसाठी उत्कृष्ट खेळाडू म्हणून झाली होती. तसेच गणेश पाधी, मानव बवमने, आर्यन शिशपाल या विद्यार्थ्यांची.१४ वर्ष वयाखालील विद्यार्थ्यांमधुन के.व्ही करंजा विद्यालयाने मुंबई विभागीय कर्णधार तीसरे पारितोषिक पटकावले त्या विद्यार्थ्याचे नाव आहे शुभम नागे, व उपकर्णधार रोहीत गायकवाड तर १४ वर्षाखालील मुलांच्या के. व्ही करंजा विद्यालयाने दूसऱ्या पोजीशन मधुन मुंबई विभागीय गटात कर्णधार नीतू गायकवाड
हिची निवड झाली आहे.आणि १७ वर्षाखालील वयोगटात निवड झाली आहे मुंबई विभागीय स्पर्धेसाठी आदित्य गायकवाड या विद्यार्थ्यांची. शाळेतील या क्रिडा क्षेत्रातील यशस्वी भरारी घेण्यासाठी विद्यार्थ्यांना मोलाचं मार्गदर्शन केले आहे ते कोच अमीत व बी. एन. पंंडेकर यांनी विशेष मेहनत घेतली आहे. शाळेतील मिळालेल्या या क्रिडा क्षेत्रातील यशाचे शाळेचे व याकरीता मेहनत घेतलेले त्यांचे मार्गदर्शक व विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.