मुरूड जंजिरा(प्रतिनिधी,सौ नैनिता कर्णिक) – मुरूड जंजिरा.रायगड मुरूड- जंजिरा नगरपरिषद हद्दीतील सी.के.पी.समाज हाॅल बांधकाम करणे या कामाचा उदघाटन सोहळा आयोजित करण्यात आला. यावेळी मा.आदरणीय श्री *महेंद्रशेठ दळवी साहेब,आमदार अलिबाग-मुरूड विधानसभा यांच्या शुभहस्ते पंकज भूसे प्रशासक तथा मुख्याधिकारी मुरूड नगरपरिषद यांच्या उपस्थितीत उदघाटन सोहळा संपन्न झाला. प्रथम नैनिता कर्णिक समाज अध्यक्षा यांनी महिला समवेत सर्व मान्यवरांचे औक्षण केले. तद्नंतर नयन कर्णिक सेवानिवृत्त तहसीलदार यांच्या हस्ते श्रीफळ वाढविण्यात आले.समाज हाॅल उदघाटन मा.आमदार महेंद्रशेठ दळवी , ज्येष्ठ समाजबांधव हेमकांत चिटणीस,पंकज भुसे ,समाज अध्यक्षा नैनिता कर्णिक सर्व विश्वस्त समाजबांधव यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
प्रथम सर्व उपस्थित मान्यवर कार्यक्रमाचे औचित्य साधून सी.के.पी समाज हाॅल बांधकाम कर-ण्यासाठी ज्यानी मोलाचे सहकार्य केलेल्या मान्यवराचे आमदार महेंद्रशेठ दळवी मुरूड- जंजिरा नगरपरिषद मुख्याधिकारी तथा प्रकाशक पंकज भुसे चिदानंद व्हटकर साहेब,प्रशासन अधिकारी परेश कुंभार साहेब माजी नगराध्यक्षा स्नेहा माई पाटील मुरूड नगरपरिषद व समाज हाॅलचे बांधकाम करणाऱ्या नितिना नाक्ती या सर्वांचा चांद्रसेनिय कायस्थ प्रभु समाज व देवस्थान ट्रस्ट मुरूड यांच्या तर्फे सर्व मान्यवरांचा सत्कार श्रीफळ, शाल, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह (देवतांची फ्रेम) समाज अध्यक्षा नैनिता कर्णिक,उपाध्यक्ष अशोक सबनीस,कार्यवाह संदेश मथुरे,विश्वस्त सौ सुप्रिया मथुरे,विनय रा मथुरे,राजेंद्र पोतनीस,विनय मथुरे यांच्याकडून करण्यात आला. उदघाटन सोहळ्यासाठी माजी नगराध्यक्ष अशोक धुमाळ, मा.भरत बेलोसे ,माजी समाज अध्यक्ष सुनील कुळकर्णी उपाध्यक्ष मनोहर दिघे, रवि पोतनीस, सुरेंद्र दिघे सुनील मोहिले प्रतिभा मोहिले नंदकुमार कर्णिक प्रतिभा कर्णिक भारती मथुरे स्नेहप्रभा महिला अध्यक्षा जयश्री प्रधान,उपाध्यक्षा सुचिता पोतनीस कार्यवाह साक्षी नागले यांनी कार्यक्रमासाठी मदत केली. मनोगतात आमदार महेंद्रशेठ दळवी साहेब यांनी मुरूड विकासकाम अंतर्गत मुरूड मधील केलेल्या कामाविषयी प्रतिपादन केले.व मी नेहमी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. सूत्रसंचालन स्नेहा रणदिवे यांनी केले.अध्यक्षा नैनिता कर्णिक यांनी सर्व मान्यवर,समाज बांधव,कार्यकर्त,पत्रकार,फोटोग्राफर माजी नगरसेवक,नगरसेविका युगा ठाकुर,मेघाली पाटील व सर्व उपस्थिताचे आभार मानले. अल्पोपहारानंतर कार्यक्रमाची सांगता केली.