जालना (प्रतिनिधी) :- जालना शहराचा नगर पालीकेला महानगर पालिकेत रूपांतर विरोधात तथा शहरातिल झोपडपट्टयांना मालकी हक्क प्रदान करने बाबतचे निवेदन दिनांक ११ गुरुवार रोजी काँग्रेस सेवादलाच्या वतीने मा. मुख्यमंत्री आणि जालना जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.
जालना शहराचे नगर पालिकेला महानगर पालीकेत रूपांतर करण्यास शासनाने अधिसुचना जारी केले आहे. याविषयी आम्ही जालना शहराचा महानगर पालीकेत रूपांतर करण्यास पुर्णपणे विरोध करीत आहे. हा एक तर्फी निर्णय बालकणीत बसुन घेतलेला निर्णय आहे. गोगरीबांचे उद्योगावर मारलेला हतोडा आहे. महानगर पालीका होण्यापुर्वीच जालना नगर पालीकने ९५% टक्के जालना शहराचा विकास केला आहे. पाणी, स्वच्छता, रस्ते, स्ट्रीट लाईट व इतर नागरी सुविधा उपलब्ध करून जालना शहराचा मोठा विकास मा. नगरअध्यक्षा संगीता ताई गोरंट्याल यांच्या नेतृत्वात विकास करण्यात आला आहे. जालना शहरात ३०/३५ वर्षांपासून बसलेल्या झोपडपट्टया आज पर्यंत मालकी हक्कापासून वंचित आहे. ही बाब लक्षात घेता जालना शहरातील झोपडपट्यांना जो पर्यंत मालकी हक्क प्राप्त होत नाही, पी. आर. कार्ड उपलब्ध करून देत नाही तो पर्यंत आम्ही जालना नगर पालिकेचा महानगर पालीकेत रूपांतर विरोध करीत आहोत आशा आशयाचे निवेदन काँग्रेस सेवादलाच्या वतीने मा. मुख्यमंत्री यांना देण्यात आले.
निवेदनात पुढे नमूद करण्यात आले की, शहरातील मोठया झोपडपट्टी वस्त्या, चंदनझीरा, कन्हैयानगर, संजयनगर, नुतन वसाहत, रामनगर, गांधीनगर, इंदिरानगर, व इतर झोपडपटीवासियांच्या घरांना संरक्षण मिळणे अत्यंत गरजेचे आहे. महानगर पालिकेत रूपांतर झाल्या नंतर या झोपडपट्यांना उठविण्याचा किंवा बुलडोजर चालवून झोपडपट्यांचा जागा मोठया बिल्डरांच्या ताब्यात देण्याचा डाव शासनाकडून होत असेल, या मध्ये स्थानिक नेत्यांचा यापुर्वीही झोपडपटयावर बुल्डोजर चालविण्याचा प्रयत्न होता. जालना शहर नगर पालिकेला महानगर पालिकेत रूपांतर करण्याचा हा डाव फक्त टॅक्स वसुली व गोरगरीबांच्या घरावर व धंदयावर हातोडा मारण्याचा आहे. जेणे करून या विरूध्द आम्ही या निवेदनाद्वारा विनंती करतो की, शासनाने त्वरीत जालना शहर नगर पालिकेला महानगर पालिकेत रूपांतर करण्याचा निर्णय रद्द करून,किंवा स्थगीती दयावी अन्यथा कॉंग्रेस सेवादल, तसेच सामाजिक संघटना व शहरातील मुख्य सामाजिक कार्यकर्ता सोबत १९/५/२०२३ रोजी मा. जिल्हाधिकारी कार्यालय, जालना समोर निषेध आंदोलन केले जाईल असा ईशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
दिलेल्या निवेदनावर अब्दुल रफीक (जिल्हा कार्यध्यक्ष कांग्रेस सेवादल, जालना)संगीता कांबळे (शहराध्यक्षा, कांग्रेस सेवादल, जालना),सय्यद मुंन्शी (तालुका अध्यक्ष, कांग्रेस सेवादल, जालना),किशोर गायकवाड,शेख सलमान,शेख मुन्ना,कैलाश क्षीरसागर,शोएब खान,गणेश गिराम,गणेश काकासाहेब दानवे,विष्णु कडूबा भालेराव,मोहम्मद सलीम ई. च्या स्वाक्षऱ्या आहेत.