नाशिक * नागरिकांच्या सुविधेसाठी तयार करण्यात आलेला समृद्धी महामार्ग जीवघेणा ठरत आहे. समृद्धी महामार्गावरील अपघातांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. आजही नाशिकजवळ समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला. या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 4 जण जखमी आहेत.
मध्यरात्रीच्या सुमारास हा अपघात झाला आहे. इनोव्हा कारवरील ड्रायव्हरचं नियंत्रण सुटल्याने हा भीषण अपघात झाला आहे. कारने महामार्गावरील कठड्याला इतकी जोरदार धडक दिली की कारचा पुढील भागाचा अक्षरश: चक्काजूर झाला. समोरील भाग पूर्णत:चेपला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार हज यात्रेसाठी नातेवाईकांना मुंबईला सोडून परत येत असताना हा भीषण अपघात झाला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना मदत केली. अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला आहे. 4 जण जखमी झाले आहे. जखमींना उपचारासाठी शिर्डीच्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अपघातानंतर बघ्यांचीही मोठी गर्दी याठिकाणी जमली होती. त्यामुळे वाहतुकीवरही परिणाम झाला होता.