अकोला – शेतीच्या वादातून मुलांनीच जन्मदात्या पित्यावर प्राणघातक हल्ला केला. अकोला जिल्हातल्या बाळापूर तालुक्यात ही खळबळजनक घटना घडली. या हल्ल्यात वडील गंभीर जखमी झाले असून सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, अकोल्याच्या बाळापूर तालुक्यातील शेतकरी जितेंद्र ताथोड यांच्यावर मुलांनी प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली. घरगुती वादातून हा सगळा प्रकार घडला. जितेंद्र ताथोड यांच्याकडे राम ताथोड व बजरंग ताथोड यांनी घरचा हिस्सा मागितला. मात्र जितेंद्र ताथोड यांनी त्यास नकार दिला.
याच कारणाने दोन्ही भावांनी संगनमताने जीवे मारण्याची धमकी देत वडिलांवर कोयत्याने सपासप वार केले. मुलांनी केलेल्या या हल्ल्यात वडील गंभीर जखमी झाले आहेत. घटनेनंतर त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले.
सध्या जितेंद्र ताथोड यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होत असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणी मारहाण करणाऱ्या दोन मुलांवर उरळ पोलीस स्टेशमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खळबळजनक घटनेने संपूर्ण बाळापूर तालुका हादरुन गेला आहे.