तामिळनाडू : येथून अपघाताची एक मोठी घटना समोर आली आहे. मदुराई येथे धावत्या ट्रेनने अचानक पेट घेतला आहे. आगीने रौद्ररुप धारण केल्याने ८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर २० हून अधिक व्यक्ती जखमी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, पुनालूर-मदुराई एक्सप्रेसमध्ये ही भीषण आग लागली आहे. आज पहाटे ५ च्या सुमारास प्रवाशी साखर झोपेत असताना काळाने त्यांच्यावर घाला घातलाय.
अग्निशमन दलाने आग नियंत्रणात आणली असून अन्य डब्यांचे कोणतेही नुकसान झालेले नाही. काही प्रवाशांनी गॅस सिलिंडरची ट्रेनमधून नेल्याचा आरोप अन्य प्रवाशी करतायत. ट्रेनमधून सिलिंडर आणल्यानेच आग लागल्याचे दक्षिण रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.