अंबड : राज्य शासनाच्या मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम या महत्वकांक्षी योजनेअंतर्गत घनसावंगी मतदारसंघातील बेरोजगार युवकांना रोजगारासाठी कमाल ३५ टक्के अनुदानावर शेतमाल वाहतूक करणाऱ्या वाहनांचे वाटप करण्यासाठी समृद्धी साखर कारखान्याचे चेअरमन तथा भाजप नेते सतीश घाटगे यांच्या पुढाकारातून विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत पात्र लाभार्थींना वाहन वाटप करण्यास शनिवारी सुरुवात झाली. देवी दहेगाव येथील शेतकरी नागेश नारायण शिंदे यांना शनिवारी वाहन देण्यात आले. अंबड येथील जनसेवा कार्यालयासमोर सतीश घाटगे यांनी नारायण शिंदे यांना देण्यात आलेल्या वाहनाचे पूजन केले. यावेळी समृद्धी साखर कारखान्याचे संचालक विक्की शिंदे, बाबा उढाण, ईश्वर धाईत, योजनेचे समन्वयक आनंद बामणे, गणेश टाकले यांची उपस्थिती होती.
जिल्हा उद्योग केंद्राच्या योजनेचा एक भाग असलेली ही योजना आहे. या योजनेंतर्गत शेतकरी व बेरोजगार युवकांना कमाल ३५ टक्के अनुदानावर विविध प्रकारची शेतमाल वाहतूक करणारी वाहने वाटप करण्यात येणार आहे. शेतमाल वाहतूकीचा व्यवसाय करण्यासाठी इच्छुक असलेल्या पात्र शेतकरी व युवकांना या योजनेचा लाभ देण्यात येत आहे.