जालना : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या वतिने आयाेजित जादुटाेणा विराेधी कायदा राज्यस्तरिय जनसंवाद यात्रे निमित्त दि. 26 व दि.27 आँगस्ट राेजी जालना जिल्ह्यात विविध ठिकाणी कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले हाेते. या कार्यक्रमाची सुरुवात अंबड चाैफुली येथुन सहा.आर टी अेा राधा साेळुंके यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवुन करण्यात आली.
या दाेन दिवसीय कार्यक्रमात शाळा,महाविद्यालय,गावकर्यां साठी कार्यक्रम घेण्यात आले. यात कै.बाबुराव जाफ्राबादकर मा.शाळा जालना, जि.प प्रशाला कंडारी खुर्द व कंडारी चे ग्रामस्थ ,मत्स्याेदरी महाविद्यालय जालना, वसंतराव नाईक नर्सिंग काँलेज जालना, वनरक्षक प्रशिक्षण केंद्र जालना,एस आर पी एफ जालना,नालंदा बुध्दविहार नागेवाडी येथे कार्यक्रम घेण्यात आले.यात राज्य कार्यकारी समितीचे मा.प्रशांत पाेतदार सातारा,मा.नंदिनी जाधव पुणे ,मा.भगवान रणदिवे सातारा यांनी जादुटाेणा विराेधी कायदा व सह प्रात्याक्षिक अंधश्रद्धा निर्मुलनावर मार्गदर्शन केले.
या प्रसंगी जालना जिल्हा कार्याध्यक्ष ज्ञानेश्र्वर गिराम,जिल्हा अध्यक्षा विमलताई आगलावे, जिल्हा प्रधान सचिव मधुकर गायकवाड , जिल्हा उपाध्यक्ष शंकर बाेर्डे ,जिल्हा पदाधिकारी प्रशांत वाघ, संजय हेरकर, अच्युत माेरे, प्रभाकर आर्सुड,संताेष माेरे, गाैतम भालेराव, माया गायकवाड, अनुराधा हेरकर,सुरेखा भालेराव,विभावरी ताकट यांनी विशेष परिश्रम घेतले व उपस्थित हाेते.