जालना – राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी वंदना सतीश खांडेभराड यांची प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे व महिला प्रदेशाध्यक्षा रूपालीताई चाकलकर, राज्याचे उपमुख्यमंत्री आजीतदादा पवार, जालना जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष अरविंदराव चव्हाण यांनी नियुक्तीपत्र दिले.
सौ. वंदना सतीश खांडेभराड या अनेक वर्षापासून सामाजिक कार्यात अग्रेसर आहे. त्याची दखल घेवून, राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाच्या जालना महिला जिल्हाध्यक्षपदी वंदना खांडेभराड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जालना शहर व जिल्ह्यात पक्षाची ताकद वाढविण्यासाठी व गोरगरीब, कष्टकरी, शेतकरी, महिला यांचे प्रश्न सोडविण्यासाठी आपला भर राहिल असे नवनियुक्त महिला जिल्हाध्यक्षा वंदना खांडेभराड यांनी सांगितले. त्यांच्या या नियुक्तीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.