शालेय विद्यार्थ्यांना सापा बद्दल माहिती असावी तसेच सापा बद्दल असलेले समज आणि गैर समज दुर व्हावेत यासाठी निसर्गरक्षक प्राणीमित्र संघटनेच्या वतीने विशेष जनजागृती करण्यात येतंय. आज दि. 18 सप्टेंबर 2023 रोजी रामनगर साखर कारखाना येथील श्री शिवाजी हायस्कुल आणि जालना येथील जनता हायस्कुल येथे विद्यार्थ्यांना सापाची माहिती देऊन मार्गदर्शन करण्यात आले.
विषारी आणि बीन विषारी साप कसा ओळखायचा, सापाबद्दल असलेले गैरसमज आणि भिती दुर करुन निसर्गरक्षण प्राणीमित्र संघटनेच्या पदाधिकार्यांनी जनजागृती केली. यावेळी संघटनेचे अध्यक्ष विशाल गायकवाड, गोकुळ लाड, मयूर साबळे, शिवाजी डाकुरकर, अजय नवगिरे, खुशी उगले, राहुल शिंदे, गोपीनाथ ढोले, रंगनाथ खरात, सुनील चव्हाण यांची उपस्थिती होती.