गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या… या जयघोषाने सर्व नगरी दुमदुमली भाद्रपद महिना आला की,गणेश स्थापना कधी होते, याची चाहूल लागते सुंदरशी लाइटिंग, मंडप,साऊंड,माइक इत्यादी वस्तूंनी भव्य दिव्य अशा वस्तूने सजावट करून गणेश स्थापना केली जाते. जेवढ्या उत्साहामध्ये आज गणेश स्थापना केली जाते तेवढाच उत्साह मध्ये आज विविध उपक्रम राबविले जातात या उपक्रमाअंतर्गत समाजाला एक नवी दिशा प्रेरणा आणि सुविचाराची मशागत होते. परंतु या काळामध्ये शहरांमध्ये उपक्रम असतात खेडेगावांमध्ये ही कार्य लोप पावत चाललेले आहे. मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं एक अनुभव सांगतो आहे. मूर्तीच्या समोर बसून पत्त्यांचा डाव खेळणे,लुडो खेळणे, पैशाचा सत्यानाश करणे इत्यादी बाबी घडताना मी पाहिलं आहे. मला तर असं वाटतं की खरोखरच गणरायाला सुद्धा मी यांच्यापाशी उगीचच आलो असं वाटत असेल ना कारण बसवण्या पुरता देखावा आणि समाजाला आपण काय द्यावं यात आपण आपले विचार मांडावे किंवा उपक्रमा अनुसार सिद्ध करावं.
जेवढ्या मोठ्या आनंदामध्ये आपण साधना करतो तेवढ्या आनंदामध्ये सुद्धा आमच्या मंडळाकडून किंवा आमच्याकडून चांगला संदेश कसा जाईल याच भान ठेवलं पाहिजे. जेणेकरून समाजाचं हित झालं पाहिजे.लोकमान्य टिळकांनी गणेश स्थापना केली म्हणून आम्ही करतोय परंतु त्यामध्ये नावीन्य काय? फक्त स्थापना करून उपयोग नसून आपण आपल्या परीनं व्यवस्थित स्थापना करून त्यांना सुंदर निरोप देऊया एकोणिसाव्या शतकामध्ये चांगल्या आणि उदात्त भावनेने मूर्ती बनवून घडविले होते कारण मी बुद्धीचा देवता असून माझी पूजाअर्चा एकत्रित लोक जमून बंधुप्रेम जोपासलं जाईल इत्यादी गोष्टी घालून टिळकांनी आपल्याला स्थापना करावयास सांगितले आहेत.थोडा वेगळा कल या काळात दिसत आहे डिजे पुढे नाचणार आणि दारू पिऊन निरोप देतात हे वास्तव आहे. परंतु अशा गोष्टीवर आपली लेखणी योग्य वेळी उचललेली पाहिजे. आपण रोखठोक बोलल्याशिवाय इतरांना विचारांची आदान-प्रदान होणार नाही. या स्पर्धेमध्ये मी माझ्या विचाराने टिकतो का माझ्या मध्ये बदल काय केला पाहिजे? आत्मचिंतन करण्याचं हाच सप्ता आहे. नुसतं गणपती बाप्पा मोरया म्हणून उपयोग नाही. मला एकच सांगायचे आहे की ईश्वर असो अथवा नसो आपण आपलं कार्य केलं पाहिजे. जो ईश्वरांना मानत नाही तो स्मशान समान असेल. एक नाणं भक्तीचं त्याचीच दुसरी बाजू आपण केलेली सेवा होय. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांचा आदर आपण कसा ठेवायचा हे ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे.
ज्यावेळी आपण महाप्रसाद घेतो त्यावेळी त्याचा एकही दाणा खाली पडला जाणार नाही. ही काळजी घेतल्यास आपल्या रक्तात देव वसतो महाप्रसाद जेवढ्या आवडीनं आपण घेतो तेवढ्याच प्रेमानं आपल्याला त्यांचा मोबदला मिळतो पण तो कोणत्याही स्वरूपात असतो याची जाणीव आपल्याला झाली पाहिजे. काल एका महापूजेसाठी मी गेलो असता खडीसाखर आणि चुरमुरे प्रसाद द्यायचा होता, त्या ठिकाणी चुरमुरे होते पण खडीसाखर नव्हती म्हणून गणपतीच्या पाट्या खाली ठेवलेली होती असे एका मित्राने सांगितल्यानंतर त्याठिकाणी मी हात घालून घेतल्यानंतर त्या पुडी मध्ये मला तंबाखू दिसली यातूनच आपले कार्यकर्ते कसे आहेत हे लक्षात येतं कुठं काय करावं कुठं काय करू नये याची जाणीव त्याला झाली म्हणजे मोक्ष नक्कीच मिळणार. युवा वर्गाने यात हिरिरीने भाग घेऊन विविध उपक्रम राबवून समाजाचा खारीचा वाटा उचलावा. त्यातील प्रत्येक कार्य करावं या मताचा आहे.
सुरज रामचंद्र अंगुले
जळकोट(छ.संभाजी नगर)
मो.७७१९८७६३१३,७३८५४७६३६३