जालना – जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील कल्याणी शिवारात गट क्रं, 279 मध्ये एका शेतकर्याने तुरीच्या शेतामध्ये तब्बल एक एकर क्षेत्रावर गांजाची लागवड केल्याचं समोर आलंय.शेख गौसखा शेख सरदार पठाण असं गांजा लागवड करणार्या शेतकर्याचं नाव आहे.
पोलिसांनी या गांजा शेतीवर धाड टाकली असून लाखो रुपयांचा गांजा या कारवाईत जप्त करण्यात आलाय.पोलिसांना या ठिकाणी तुरीच्या शेतात गांजा लागवड करण्यात आल्याची माहिती मिळाली होती. या माहितीवरुन ही धाड टाकण्यात आली. तुरीत लावण्यात आलेल्या गांजाची झाडं इतक्या मोठ्या आकाराची होती की, ही झाडं उपटण्यासाठी पोलिसांना गावकर्यांची मदत तर घ्यावीच लागली पण मजूर देखील लावावे लागले.
सध्या जप्त करण्यात आलेल्या गांजाची मोजदाद सुरू असून आरोपी शेतकर्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. सदरील कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक चैन सिंग गुसिंगे, पीएसआय विलास घुसिंगे, पीएसआय विजय आहेर, नायब तहसीलदार कृषी विभागाचे तलाठी सोनवणे, तसेच पोलीस स्टेशन स्टाफचे पोलीस हेडकॉन्स्टेबल सिनकर, सरडे, खिल्लारे, गणेश पायघन, शिवाजी जाधव, नितेश खरात, संतोष जाधव, शरद शिंदे, महिला पोलीस शिपाई कविता बारवाल, रूपाली नरवाडे, कृष्णा गवळी, होमगार्ड तेलंग्रे, बोडखे, खरात, लोखंडे, जाधव इत्यादींच्या वतीने कारवाई करण्यात आली असून तलाठी एपी बावस्कर, बालाजी पापुलवाड (नायब तहसीलदार) तलाठी बीएस सोनवणे यांनी कारवाईसाठी परिश्रम घेतले.