जळकोट – राज्यात बचत गटाच्या माद्यमातून महिलांनी आर्थिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रात प्रगती केली असून ग्रामीण भागातील महिलांनी गृह व लघु उद्योगाची निर्मिती करून आपला आर्थिक विकास करावा असे विचार महिला आर्थिक विकास महामंडळाच्या जिल्हा समन्वय अधिकारी शोभा कुलकर्णी यांनी व्यक्त केले.
शोभा कुलकर्णी या उमरगा येथे महिला आर्थिक विकास महामंडळ, [माविम] जिल्हा कार्यालय, धाराशिव द्वारा संचलित ज्ञानदिप लोकसंचलित साधन केंद्र, उमरगा च्या १० वी वार्षिक सर्वसाधारण व महिला मेळाव्याच्या प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होत्या.या वेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जगदेवी पाटील होत्या. यावेळी प्रमुख पाहुने तहसिलदार गोविंद येरमे, योगेश कंदले शाखाधिकारी बँक ऑफ महाराष्ट्र, उमरगा, डॉ. श्वेता सरपे, डॉ. निवेदिता बिराजदार, सुमित कोथिंबीरे प्रथम फौंडेशन संपर्क अधिकार व धम्मचारी प्रज्ञाजीत अधिक्षक बहुजन हिताय विध्यार्थी वस्तीगृह, उमरगा हे उपस्थित होते.
या वार्षिक सर्व साधारण सभेचे उद्घाटन क्रांती ज्योती साविञीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण व दिपप्रज्वलन करुन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात इतनी शक्ती हमे देना दाता या प्ररणा गीतने करण्यात आली. यावेळी गोविंद येरमे यांनी महिला सक्षमिकरणात माविमचा सिंहाचा वाटा आहे. महिलांनी उद्योगाच्या माध्यमातून स्वताची व कुटुंबाची आर्थिक प्रगती करावी व वय वर्षे १८पूर्ण व नवविवाहित महिलांनी आपली मतदार नोंदणी करावी याबाबत मार्गदर्शन केले.
या वेळी तहसिलदार येरमे यांचा हस्ते बँक ऑफ महाराष्ट्र, शाखा उमरगा यांचे कडून ५ संयुक्त दायित्व गट यांना कर्ज मंजुरी यांच्या वितरीत करण्यात आले. यावेळी श्री.योगेश कंदले यांनी महिलांनी या कर्जाचा वापर व्यवसायासाठी करावा तसेच माविम मार्फत स्थापन महिला बचत गट यांचे कर्ज परतफेड १००% असल्या बद्दल माविम व कर्मचारी यांचे अभिनंदन करून महिलांना मार्गदर्शन केले. यावेळी योगेश कंदले यांचा माविम मार्फत उत्कृष्ट बँकर्स म्हणून स्मृतीचिन्ह देऊन गौरव गोविंद येरमे तहसिलदार यांच्या हस्ते करण्यात आला. यानंतर डॉ. श्वेता सरपे, डॉ. निवेदिता बिराजदार वैदकीय अधिकारी यांनी महिलांच्या आरोग्य व आहार या विषयी मार्गदर्शन केले.
या प्रसंगी उत्कृष्ट ग्रामसंस्था म्हणून जय संतोषीमाता महिला ग्रामसंस्था, येळी , उत्कृष्ट बचत गट म्हणून आंबिका महिला बचत गट, कदेर, उत्कृष्ट CRP म्हणून सौ. नंदा कांबळे येळी, उत्कृष्ट सहयोगिनी म्हणून सौ. सखु सोनकांबळे, उत्कृष्ट कार्यकारणी म्हणून सौ.महादेवी माळी [सदस्य, मुळज] व सामाजिक कार्यकर्ते मा.धम्मचारी प्रज्ञाजीत व मा. सुमित कोथिंबीरे यांचा स्मृतीचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
यानंतर मा. प्रज्ञाजीत यांनी महिलांना मार्गदर्शन केले व गरीब व गरजू विद्यार्थी यांना बहुजन हिताय विद्यार्थी वस्तीगृहात असणाऱ्या सुविधा इत्यादी बाबत मार्गदर्शन केले. यावेळी मा. सुमित कोथिंबीरे यांनी तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगार युवक व युवतींसाठी प्रथम फाऊंडेशन मार्फत मोफत दिल्या जाणाऱ्या स्वयंरोजगार प्रशिक्षण घेऊन स्वावलंबी व्हावे असे आव्हान केले.
सौ.छाया कांबळे [सचिव, ज्ञानदिप CMRC, उमरगा] यांनी मागिल वर्षाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त वाचन केले व कायम करण्याचा ठराव पास करण्यात आले. विषय पञिकेनुसार सर्व ठराव सर्वानुमते पास करण्यात आले. यावेळी सुरेखा पाटील कोषाध्यक्ष, यांनी २०२२-२३ मधील भौतिक व आर्थिक अहवाल वाचन करुन कार्यालयाचा बिजनेस, लक्ष व साध्य ची माहिती सभेस दिली. तसेच सुनिता पाटील सदस्य , यांनी २०२३-२४ चे भौतिक व आर्थिक नियोजन तसेच बिजनेस प्लँन सभे पुढे मांडला व सर्वानुमते मंजुरी ठराव पास करण्यात आला.
या कार्यक्रमाचे प्रस्ताविक किशोर टोंपे व्यवस्थापक यांनी केले तर सुञसंचलन सौ.सखु सोनकांबळे व सौ.नंदा कांबळे यांनी केले. सौ. जगदेवी पाटील यांनी अध्येक्षीय मार्गदर्शन केले व शेवटी सौ. ममता पाटोळे यांनी आभार प्रदर्शन केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पांडुरंग गायकवाड, स्वालेहा मुल्ला, महानंदा अगंबरे, अयोध्या बनसोडे, कोमल गायकवाड, ज्योती माने, विद्या कांबळे, राणी मोरे, छाया शिंदे, संगीता मुळे,कविता जाधव,अनुसया जाधव यांनी परिश्रम घेतले.