अंबड : व्यापारी बाजारपेठ म्हणून प्रसिद्ध असलेल्या अंबड तालुक्यातील शहागड -वाळकेश्वर गावातील शिवसेनेच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यासह युवकांनी समृद्धी कारखान्याचे चेअरमन तथा भाजप नेते सतीश घाटगे यांच्या नेतृत्वाखाली भाजपमध्ये प्रवेश केला. अंबड येथील जनसेवा कार्यालयात मंगळवारी हा पक्ष प्रवेश सोहळा उत्साहात पार पडला.
शिवसेनेचे विभाग प्रमुख संतोष जाधव, शिवसेनेचे शाखा प्रमुख साईनाथ डोंगरे, इम्रान पठाण, शेख रफिक,अन्सर शेख, एजाज शेख, शफिक सय्यद, अतीक सय्यद, अनिस बागवान, दीपक धानुरे, विलास तुरकमारे, बंडू मुळे, सखाराम कचरे, जावेद बागवान, संजय रोटेवार, नितीन येटाळे, संदीप डोंगरे, सुरेश शेळके, हनुमान देवडकर, विलास धोत्रे, प्रकाश परदेशी यांच्यासह आदींनी यावेळी पक्ष प्रवेश केला. सतीश घाटगे यांनी सर्वांचा सत्कार करून पक्षात स्वागत केले. यावेळी बाजार समितीचे उपसभापती अरुण घुगे, डॉ. रमेश तारगे, प्रणीत हर्षे, सरपंच विठ्ठल सुडके, ज्ञानेश्वर डोईफोडे, कृष्णासिंग पवार, रमेश काळे, बाबासाहेब दखने, ईश्वर धाईत, आबासाहेब पवार, महेश कांबळे राहुल गुळजकर, इक्बाल बागवान, विठ्ठल खरात आदी उपस्थित होते.
२५ वर्षात गावच्या मुलभूत प्रश्न न सुटल्याने गावातील विकासाचे प्रश्न सोडविण्यासाठी भाजपमध्ये प्रवेश केल्याचे यावेळी युवकांनी सांगितले. गावच्या विकासाचे प्रश्न सोडविण्याबरोबरच शहागडला समृद्ध व्यापारी शहर बनविण्यासाठी प्रयत्न करण्याचा शब्द यावेळी सतीश घाटगे यांनी दिला.