जालना । प्रतिनिधी – जिल्ह्यातील साम टिव्हीचे प्रतिनिधी लक्ष्मण सोळुंके यांच्यावर झालेल्या हल्ल्यातील आरोपींना तात्काळ अटक करण्याच्या मागणीसह शेतकर्यांची आर्थिक लुट करणार्या वीमा प्रतिनिधींवरही गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी जिल्ह्याभरातून होत आहे. घडलेल्या घटनेचा निषेध नोंदवत जिल्ह्यातील पत्रकारांसह शेतकरी संघटनांही आक्रमक झाल्या आहेत.
रविवार (दि.8) रोजी अंबड, भोकरदन नंतर आता मंठा व परतूर तालुक्यातील पत्रकारांनी सोमवार (दि 9) रोजी प्रेस कॉन्सील ऑफ महाराष्ट्राचे राष्ट्रीय अध्यक्ष इलियास खान, जिल्हाध्यक्ष जालना, दीपक शेळके व परतुर तालुका अध्यक्ष प्रभाकर प्रधान, यांच्या मार्गदर्शनाखाली परतुर पोलीस स्टेशनचे निरीक्षक एम. टी. सुरवसे यांच्या मार्फत
पोलीस निरीक्षकांमार्फत पोलीस अधिक्षकांना निवेदन दिले आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, भोकरदन तालुक्यातील कोलते पिंपळगाव या गावातील शेतकरी यांच्याकडून युनिवर्सल सोमपो जनरल विमा कंपनीचे प्रतिनिधी ऑनलाईन केलेल्या तक्रारीच्या कागदपत्रांची पडताळणी व पिकांची पाहणी करण्यासाठी आलेले असतांना नुकसानग्रस्त शेतकर्यांकडून पैशाची मागणी करीत असल्याची माहिती साम टिव्हीचे लक्ष्मण सोळुंके यांना काही शेतकर्यांनी दिली. त्यावरुन खात्री करण्यासाठी व वृत्तांकनासाठी ते त्या ठिकाणी गेले असता तेथील गावगुुंडांनी वार्तांकन करण्यास मज्जाव करून तु लय पत्रकार झालाय का असे म्हणून शिवीगाळ करून कॉलर धरून धक्काबुक्की केली व तु जास्त माजला आहे, तुला पाहुन घेऊ असे म्हणून जीवे मारण्याची धमकी दिली. या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना अद्याप अटक करण्यात आली नाही, आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी करण्यासह घटनेचा निषेध करण्यात येत आहे. यासह शेतकर्यांची आर्थिक लुट करणार्या वीमा प्रतिनिधींवरही गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येत आहे.
मंठा येथील निवेदनावर प्रेस कॉन्सील ऑफ महाराष्ट्र जालना जिल्हा उपाध्यक्ष हरीराम तिवारी, प्रेस कॉन्सीलचे मंठा तालुकाध्यक्ष अशिष तिवारी, जिल्हा कार्यकारिणी सदस्य मारेश्वर बोराडे, मंठा तालुका उपाध्यक्ष योगेश गणगे, मंठा सचिव रशिद खां पठाण. सहसचिव रवी बोराडे, कोषाध्यक्ष सचिन नरवाडे, सदस्य आशिष मोरे, उस्मान पठाण, बाळासाहेब खराबे, मुरलीधर बिडवे, सुभाष वायाळ, जीवन काळे, गणेश खराबे, सोनाजी जाधव, सुशील घायाळ, आतिष राठोड, दत्ता खरात आदींच्या सह्या आहेत.
परतूर तालुक्यातून दिलेल्या निवेदनावर प्रेस कॉन्सीलचे परतूर तालुकाध्यक्ष प्रभाकर सोपान प्रधान यांच्यासह पत्रकार प्रभाकर प्रधान, सुरेश कवडे, माणिक जैस्वाल, अक्षय राऊत, पांडुरंग शेजुळ, गणेश लालझरे, संजय देशमाने, संतोष शर्मा, अॅड. सुरेश काळे, परमेश्वर भिलारे, दत्ता गवळी, दीपक वक्ते, रवी भदरगे, अशोक ठोके आदींच्या स्वाक्षर्या आहेत.