उरण (तृप्ती भोईर) – बुधवार दिनांक ११ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी १० ते १ या वेळेत वाकरुळ ग्रामपंचायत हद्दीतील वाकरुळ, पानेड, म्हैसकोंड, खरबाची वाडी, निंबारवाडी, राजमाची, काटीचीवाडी, भोगेश्वर येथील दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शाळेची, अभ्यासाची गोडी लागावी,या उद्देशाने या शाळेच्या ठिकाणी जाऊन स्वराज्य प्रतिष्ठान पेण पूर्व विभाग तर्फे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले.