जालना – महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समिती जालनाच्या वतीने १० ऑक्टोबर राेजी जागतिक मानसिक आराेग्य दिनानिमित्त चर्चा सत्राचे आयाेजन करण्यात आले हाेते या चर्चा सत्रात परिवर्तन संस्थेच्या पूणे येथील मानसोपचार तज्ञ डॉ. रेश्मा कचरे, राणी बाबर, ताेशिता मँडम,ब्रम्हनाथ निलकंठ यांची प्रमुख उपस्थिती हाेती.
ताण-तणाव ,डिप्रेशन व व्यसनाधीनता यात दारु ,गुटखा अंमली पदार्थ, बिडी , सिगारेट या व्यसनाचे परिणाम तर आहेच या शिवाय शालेय विद्यार्थी पासुन ते महाविद्यालयीन तरुण -तरुणी अंमली पदार्थाच्या व्यसना साेबतच माेबाईलचे व्यसनी झाल्याने त्यांच्या वर्तनात हिंसक बदल झालेले आहेत .यातुनच आत्म हत्येचे प्रमाण ही वाढले आहेत त्यामुळे मुलांना वेळ देणे त्यांना बाेलते करणे या शिवाय त्यांची मैदानी खेळाकडे रुचि निर्माण करणे ही पालक म्हणुन माेठी जबाबदारी आहे.
न्युक्लीअर फँमिली मुळे मुले अधिक एक्कल काेंडी झाली आहेत. शिवाय व्यसनाधिनतेचे प्रमाण शाळकरी मुलां मध्ये वाढल्याने शिक्षकां समाेर माेठे आव्हान आहे ते विविध उपक्रम राबवुन आणि मुलांना विश्वासात घेवुन सफल हाेवु शकते त्याच प्रमाने मानसिक आजार जडल्याने अनेक परिवार अंधश्रध्देकडे वळतात त्यातुन बुवा बाबां च्या नादी लागुन अनेकांचे शाेषण हाेते यात महिलांची शाेषणांची अनेक प्रकरणे येतात त्यामुळे मानसाेपचार तज्ञांचा सल्ला घेवुन अैाषधाेपचार करणे हाच खरा इलाज असताे असे प्रतिपादन मान्यवरांनी या चर्चा सत्रात केले .
या प्रसंगी महा.अंनिस चे जिल्हा प्रधान सचिव मधुकर गायकवाड, जिल्हा कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर गिराम, जिल्हा पदाधिकारी मनाेहर सराेदे, संताेष माेरे, अरविंद खरात, माया गायकवाड , सुरेखा भालेराव , सामाजिक कार्यकर्त्या इंदुताई गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती हाेती.