जालना – शहर वाहतूक शाखेकडून दिनांक 1 ऑक्टोबर पासून बेशिस्त वाहनधारकांवर जे वाहनधारक गाडीचे कागदपत्र जवळ बाळगत नाही किंवा गाडीवर विना नंबरची नंबर प्लेट लावून प्रवास करतात अशा वाहनधारकांवर कारवाईचा धडाका सुरू केला आहे, या कारवाईमध्ये जालना शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांकडून आतापर्यंत दोन लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असल्याची माहिती जालना वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक यांनी दिली आहे, या मध्ये 110 गाड्यांवर करवाई करण्यात आली आहे. त्यामुळे वाहनधारकांनी वाहन चालवताना गाडीचे कागदपत्र, लायसन व गाडीचा नंबर प्लेट व्यवस्थित असल्याची खात्री करून प्रवास करावा असे आवाहन जालना वाहतूक शाखेच्या वतीने करण्यात आले आहे.
सदरील कारवाई पोलीस अधिक्षक शैलेश बलकवडे, अपर पोलीस अधिक्षक जालना, उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जी.एस.शिंदे, पोलीस अंमलदार जे. आर. शेख, ए. के. सय्यद, विनोद निकम, नंदकीशोर कामे, भगवान नागरे, संजय मगरे, चंदु जाधव, शंकर वराडे, किरण कणखर, नंदकिशोर टेकाळे, पवन सुलाने, नारायण सांगळे, मपोकाँ चौधरी, भागवत यांनी पार पाडली.