जालना- राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी माजी आमदार अरविंदराव चव्हाण यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जालना जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती केल्यापासून जालना जिल्ह्यातील अनेक कार्यकर्त्यांनी इतर पक्षामधून मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश सुरू आहेत.
जालना तालुक्यातील पोहेगाव येथील उपसरपंच राजू तळेकर, ग्रा. पं. सदस्य रामराव शेळके, व माजी सरपंच लहु चव्हाण यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. तसेच निरखेडा येथील संतोष पाडमुख,विशाल पाडमुख, गणेश कळकुंबे, गौतम मोरे, कैलास पाडमुख, किरण मोरे, लंकेश्वर मोरे, आनंद पाडमुख, दिपक मोरे, सुमित मोरे, अमोल जाधव व अंबड तालुक्यातील जामखेड येथील आकाश पाजगे व विष्णू जाधव यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षामधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी तालुकाध्यक्ष संतोष ढेंगळे, जिल्हा उपाध्यक्ष राजेश पवार,पद्माकर हंडे,किशोर सवडे, प्रविण मोहीते, कृष्णा गाडेकर, नवनाथ लोखंडे, राजेश पवार यांची उपस्थिती होती.