जालना – दि. 26 ऑक्टोबर रोजी प्रहार जनशक्ती पार्टीच्या वतीने अंबड जी जालना या ठिकाणी शेतकऱ्याच्या कापूस, सोयाबीन, तूर , मूग, इतर मालाला चांगला भाव मिळावा तसेच दुष्काळी अनुदान आणि पीक विमा मिळावा याकरता प्रहार जनशक्ती पार्टीच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले .
महालक्ष्मी पेट्रोल पंपाच्या समोर पारनेर फाट्यावरती हे आंदोलन करण्यात आले ।यावेळी वाहतुकीची खूप वेळ कोंडी झाली होती ,पोलीस यंत्रणा देखील सज्ज होती. तहसीलचे कर्मचारी येऊन निवेदन देऊन आंदोलन थांबण्यात आले .यावेळी प्रहार चे शेतकरी आघाडीचे मराठवाडा अध्यक्ष विदूर लाघडे , प्रहार अंबड तालुकाध्यक्ष राम ठाकूर , प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष मोहन मुंडे, युवा आघाडीचे उपतालुकाध्यक्ष शुभम शिंदे ,महिला आघाडीचे अध्यक्ष शोभा वाघराळ, गजू जराड, सुभाष राखुंडे व प्रहार कार्यकर्ते उपस्थित होते.