कराड – पाटण ( सुप्रिया कांबळे) – केंद्र आणि राज्यातील राजकीय नेतृत्वाची मानसिकता व प्रसिद्धी माध्यमांची सध्याची भुमिका पाहता यात सकारात्मक बदल होणे अपेक्षित आहे वृत्तपत्र हे माध्यम काही प्रमाणात अद्यापही विश्वासार्हता टिकवून आहे. यासाठी प्रसार माध्यमांची भूमिका पारदर्शक हाच लोकशाही चा आवाज असल्याचे प्रतिपादन योगेश पाटणकर यांनी केले.
पाटण तालुका पत्रकार संघाच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सन्मान व सद्य राजकीय स्थिती व प्रसिद्धी माध्यमांची भुमिका यावर पत्रकारांशी मनमोकळा संवाद अया कार्यक्रमाचे राजे प्रतिष्ठानचे संस्थापक योगेश पाटणकर यांनी तळमावले, ता .पाटण येथील कार्यालयात आयोजन केले होते. राजकिय स्थिती व भुमिका पाहता यात जनता कुठे दिसत नाही प्रसिद्धी माध्यमे विशेषतःमोठ्या इलेक्ट्रानिक माध्यमांची स्थिती व भुमिका लोकशाहीला पुरक नाही त्यांची भुमिका एककल्ली वाटते. कांही वृत्तपत्रांसह प्रिंट मिडियाची विश्वासार्हता कांही प्रमाणात टिकून असल्याचे दिसते मात्र या माध्यमानीही ती कायम जपायची गरज आहे.वृत्तपत्र हे लोकशाहीचा चौथा खांब समजला जातो तटस्थ भुमिकेतून तो सामाजाचा कायम आरसा असला पाहिजे असे जनतेला वाटते यासाठी सामजिक कार्यकर्ते राजकीय पुढारी यांचा जनसंवाद बरोबर थेट लोकांशी ही संवाद होणे गरजेचे असल्याचे मत सर्व मान्यवरांनी मांडले.
यावेळी युवा उद्योजक समाजसेवक योगेश पाटणकर यांनी राजे संघर्ष प्रतिष्ठान तर्फे पाटण पत्रकार संघाच्या नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार करून सर्व पत्रकारांना वही-पेन यांचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाला माजी उपसभापती रमेश मोरे,राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा प्रतिनिधी राजेंद्र देसाई,पाटणचे माजी उप- सभापती रघुनाथ जाधव,पाटण तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष श्रीकांत पाटील, कार्याध्यक्ष – एस.एस.मोहिते, उपाध्यक्ष योगेश हिरवे,नितीन खैरमोडे,सचिव भगवंत लोहार, राज्य प्रतिनिधी जयभीम कांबळे, जिल्हा प्रतिनिधी जयवंत यादव, पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे जिल्हा समन्वयक शंकर मोहिते,अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या महिला आघाडीच्या राज्य सरचिटणीस विद्याताई म्हासुर्णे नारकर, सकाळचे ज्येष्ठ पत्रकार राजेश पाटील यांच्या सह पत्रकारांची मोठी उपस्थिती होती. जयभीम कांबळे यांनी सूत्रसंचालन केले तर सचिव भगवंत लोहार यांनी मान्यवरांचे आभार मानले.