मावळ : रात्रीच्या वेळी रहदारी नसलेल्या रस्त्यावर अडवून लूटमार केली जाते. परंतु मुंबई- पुणे एक्स्प्रेसवेवरच लूटमार झाल्याचा प्रकार घडला आहे. कामशेतच्या हद्दीमध्ये असलेल्या बहुवरखंड या ठिकाणी रात्री सव्वादोन वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला असून ट्रक चालकाला अडवून मारहाण करत लुटण्यात आले. या प्रकरणी तीन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
ट्रक चालकाला मारहाण करत त्याला लुटण्याचा प्रकार घडला होता. २० ऑक्टोबरच्या रात्रीच्या सुमारास बौर गावच्या हद्दीत मुंबई- पुणे एक्स्प्रेस हायवे रोडने मुंबई लेनवरून जात असताना तीन अज्ञात इसमांनी ट्रक अडकून ट्रकच्या समोरील काचेवर दगड मारून नुकसान केले. दरम्यान गाडीमध्ये चढून तक्रारदार यांना दगडाने डोक्यात मारून दुखापत केली तसेच तक्रार यांचा मुलगा गौरव याला कानाखाली मारून गाडी थांबवून तक्रारदार यांचे ताब्यातील चार हजार पाचशे रूपये रोख, चार हजार रुपये किंमतीचा सॅमसंग कंपनीचा मोबाईल फोन, चार हजार पाचशे रुपये किंमतीचा जिओ कंपनीचा मोबाईल फोन असा एकूण तेरा हजार रुपये किंमतीचा माल जबरीने चोरी करून चोरून नेला होता.