मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतलं आहे. यासाठी मी त्यांचं आभार मानतो. तसेच शासनाच्या विनंतीला मान देऊन आंदोलन मागे घेतल्याबद्दल मी मराठा समाजाचे आभार मानतो, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतल्यानंतर पत्रकार परिषद घेत ते असं म्हणाले आहेत.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, न्यायाधीश शिंदे समितीला मनुष्यबळही वाढवून देणं, हा त्याचा (जरांगे) मुद्दा रास्त आहे. ती मागणी आम्ही मंजूर केली आहे. सरकार म्हणून कुठलाही निर्णय घाईत घेता येत नाही. आम्हाला कुठल्याही समाजाला फसवायचं नाही. दोन महिन्याच्या मुदतीत जास्तीत जास्त काम करू. इतर समाजावर अन्याय न करता आपल्याला जे काम करायचं आहे ते करतोय. ज्यांच्या नोंदी आहेत, त्यांना प्रमाणपत्र दिले जाईल.