उरण (संगीता ढेरे) – आज प्रत्येक क्षेत्रात स्त्रीशक्तीचा जागर होतांना दिसत आहे नारीशक्ती आज प्रत्येक क्षेत्रात गगनभरारी घेत असतांना खऱ्या अर्थाने आज स्त्री सक्षमीकरणाचा आणि स्त्री पुरुष समानतेचा आदर्श निर्माण होतानां दिसत आहे त्या करिता अनेक समाजसेवी महिला सामाजिक संघटना आपलं अनमोल योगदान देतांना दिसत आहेत त्यापैकी उरण येथील श्री समर्थकृपा सखी स्वयंसहायता संस्था आणि यशोलक्ष सामाजिक संस्था उरण यांचा उल्लेख करावा लागेल. या दोन्ही संस्थाच्या संयुक्त विद्यमाने उरण येथील पालवी हॉस्पिटल जवळ आभा कार्ड आणि आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या योजनांचा सामान्य नागरिकांना त्यांच्या भविष्यात आरोग्य संरक्षणाचा लाभ घेता यावा या करिता मोफत आभा कार्ड नोंदणी आणि मोफत आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना कार्ड बनवून देण्यासाठीच्या कॅम्पचं आयोजन करण्यात आले.
श्री समर्थ कृपा सखी स्वयंसहाय्यता संस्थेच्या संस्थापिका संगिताताई ढेरे आणि यशोलक्ष सामाजिक संस्था उरणचे अध्यक्षा अभया म्हात्रे यांच्या संयुक्त विद्यमाने या दोन संस्था च्या आयोजनातून मोफत आभा कार्ड आणि आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना कार्ड बनवून देण्यात येणाऱ्या कॅम्प मध्ये कार्ड नोंदणी आणि मोफत कार्ड बनवून घेण्याकरिता मोठ्या प्रमाणात महिला भगिनींनी आणि नागरिकांनी आपली उपस्थिती दर्शवत तब्बल १५० ( दीडशे ) च्यावर नागरिकांनी ह्या कॅम्प मध्ये आपली आभा कार्ड आणि आयुष्यमान भारत जन आरोग्य योजना कार्ड नोंदणी करत कार्ड बनवून घेतली.ह्या कॅम्प मध्ये कार्ड नोंदणी करिता धुतूम गावचे युवा सामाजिक कार्यकर्ते आणि ई सेवा केंद्र चालक अभय ठाकूर यांनी तसेच नचिकेत सचिन ढेरे यांनी महत्वाचे सहकार्य केले.श्री समर्थकृपा सखी स्वयंसहायता संस्थेच्या अध्यक्षा व रायगड भूषण संगिताताई ढेरे आणि यशोलक्ष सामाजिक संस्था उरणचे अध्यक्षा अभया म्हात्रे यांच्या संयुक्त विद्यमाने ह्या मोफत कार्ड काढून देण्याच्या कार्यक्रमा करिता नागरिकांनी आणि खास करून महिला भगिनींनी विशेष मेहनत घेत आपली उपस्थिती दर्शविली. एकंदरीत हा कार्यक्रम उत्तम प्रतिसादात संपन्न झाला.