जालना – सरकारच्या शिष्टमंडळाने अंतरवली सराटीमध्ये जाऊन मनोज जरांगे-पाटील यांची भेट घेतली. शिष्टमंडळाची ही यशस्वी झाली असून जरांगे-पाटील यांनी आपलं उपोषण घेतलं. जरांगे-पाटील यांनी सरकारला २ जानेवारीपर्यंतचा वेळ द्यावा, अशी विनंती केली होती, सरकारची ही विनंती जरांगे-पाटील यांनी मान्य केली. आता दिलेला वेळ हा शेवटचा आहे. त्यामुळे वेळ घ्या पण आता आरक्षण द्या, असं त्यांनी म्हटलं. तसेच आता पुढच्या लढाईसाठी तयार राहण्याचं आवाहन देखील मनोज जरांगे-पाटील यांनी यावेळी केलं.
आज दुपारी सरकारने स्थापित केलेल्या समितीच्या न्यायमूर्तींच्या शिष्टमंडळाने अंतरवली सराटी येथे मनोज जरांगे-पाटील यांची भेट घेतली. यावेळी कुणबी प्रमाणपत्रासाठी मराठवाड्यापुरतं नव्हे तर राज्यात काम करा, असं मनोज जरांगे पाटलांनी या शिष्टमंडळाला सांगितलं. मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र का देऊ शकत नाही? असा सवालही केला.