मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी ९ दिवसांनंतर आपलं आमरण उपोषण सोडलं आहे. सर्वपक्षीय विनंतीनंतर त्यांना हा निर्णय घेतला. मात्र उपोषणानंतर आता मनोज जरांगे यांची प्रकृती आणखी खालावली आहे. जरांगे यांनी दिवाळी रुग्णालयातच जाणार असल्याचा अंदाज आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या किडनी आणि लिव्हरवर सूज आली आहे. मागच्या वेळी त्यांनी उपोषण केलं होतं त्यापेक्षाही सध्याची परिस्थिती चिंताजनक आहे. यावेळी त्यांना अधिक त्रास झाल्याचं डॉक्टरांनी सांगितले आहे. त्यामुळे पुढचे दोन आठवडे मनोज जरांगे पाटील यांना हॉस्पिटलमध्येच राहावं लागणार आहे.