मराठवाड्याचे पाणी अडविण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांनी दाखल केलेल्या याचीकेविरोधात समृद्धी साखर कारखान्यामार्फत सतीश घाटगे यांनी दाखल केलेल्या हस्तक्षेप याचिकेला यश आले. सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचे आदेश कायम ठेऊन सरकारला जायकवाडीत पाणी सोडण्यास परवानगी दिली होती. त्यानुसार सतीश घाटगे यांनी जायकवाडी धरणात पाणी सोडण्याचे आदेश संबधित अधिकाऱ्यांना देण्याची विनंती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे २१ नोव्हेंबर रोजी केली होती. देवेंद्र फडणवीस यांनी सतीश घाटगे यांच्या विनंतीची तातडीने दखल घेऊन मा.उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार नाशिकच्या दारणा धरण समूहातून जायकवाडी धरणामध्ये पाणी सोडण्याचे आदेश शुक्रवारी दिले. त्याची तातडीने अंमलबजावणी झाली असून शनिवारी सकाळी जायकवाडी धरणात पाणी दाखल झाले. जायकवाडीत पाणी येताच घनसावंगी – अंबड तालुक्यातील कुंभार पिंपळगाव, बाणेगाव, तीर्थपुरी, साष्ट पिंपळगाव , भार्डी सह अनेक गावात शेतकऱ्यांनी एकमेकांना पेढे भरवून फटाके फोडत पाणी सोडल्याचा जल्लोष साजरा. शेतकऱ्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासह समृद्धी कारखान्याचे चेअरमन सतीश घाटगे यांचे आभार मानले. तसेच अंबड येथील सतीश घाटगे यांच्या जनसेवा कार्यालयासमोर भाजप पदाधिकारी, शेतकरी व कार्यकर्त्यांनीही फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला. यावेळी भाजपच्या भटके विमुक्त आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. रमेश तारगे,युवा नेते पंकज रक्ताटे, उपसरपंच ईश्वर धाईत, भरत तनपुरे, भाजपा दलित आघाडीचे विलास जाधव, भास्कर साळवे, कैलास आढे, दत्ता निकम, पुंजाराम भडांगे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
-सतीश घाटगे, चेअरमन समृद्धी साखर कारखाना