15 ऑक्टोबर २०२३ रोजीच्या जायकवाडी धरणातील पाण्याच्या स्थितीनुसार आणि समन्यायी पाणी वाटप धोरणानुसार 31 ऑक्टोबर २०२३ पर्यंत 8.603 टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. परंतु, त्याची अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ होत आहे. याबाबत मराठवाड्यातील शेतकरी संघटना व सर्वपक्षीय नेत्यांनी निवेदने देऊनही कार्यवाही होत नसल्याने ११ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता धुळे-सोलापूर महामार्गावरील शहागड येथे शनिवारी सकाळी ११ वाजता सतीश घाटगे यांच्या नेतृत्वाखाली अंबड -घनसावंगी तालुक्यातील शेतकरी रास्ता रोको आंदोलन करणार आहेत. या आंदोलनात अंबड -घनसावंगी तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहे.
जायकवाडी धरणात हक्काचे पाणी सोडावे या विषयावर मराठवाड्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी व सर्व कार्यकर्त्यांनी पक्ष बाजुला ठेवून आपल्या हक्कासाठी एकत्र येऊन लढा उभारावा लागणार आहे. शेतकऱ्यांना सोबत घेऊन त्याची सुरवात आम्ही करत आहोत. ११ नोव्हेंबर शनिवारी शहागड येथे पैठण फाट्यावर रास्तारोको व ठेचा भाकरी आंदोलन करण्यात येणार आहे. गोदापट्ट्यातील तसेच कॅनाॅल परीसरातील सर्व शेतकऱ्यांनी या आंदोलनात सहभागी व्हावे.
सतीश घाटगे, चेअरमन, समृद्धी साखर कारखाना