जालना जिल्ह्यात काल रात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेत पिकाचं मोठं नुकसान झालंय. या झालेल्या मुसळधार पावसात काही ठिकाणी वादळी वारा तर काही ठिकाणी जोरदार गारा कोसळल्याच पाहायला मिळालंय. अवकाळी झालेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचं अतोनात नुकसान झालं असल्याने शेतकरी हवालदिल झालाय.
जिल्ह्यासह जालना तालुक्यातील रामनगर, मौजपुरी, विरेगाव, नेर, शेवली, नाव्हा, वाघरूळ आदी मंडळात मोठ्या प्रमाणात पाऊस झालाय. या अस्मानी संकटामुळे शेतकर्यांचा हातातोंडाशी आलेला घास निघून गेलाय. कपाशी, ज्वारी, गहु, हरभरा व फळबाग याचं नुकसान झाल्याने आणि नैसर्गिक संकटामुळे शेतकरी संकटात सापडलाय. शेतकरी अगोदरच दुष्काळाने होरपळून निघाला असताना आज पुन्हा एकदा संकटात सापडलाय. जालना जिल्ह्यातील निसर्गाच्या प्रकोपाने द्राक्ष, मोसंबी, डाळिंब, कापूस, हरभरा, ज्वारी, गहु या पिकांचं नुकसान झालंय. या नुकसानीची पाहणी करुन पंचनामे करावेत आणि शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी. शेतकऱ्यांनी केलीय.