जालना – जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून सुरु असलेल्या अवकाळी पावसाने शेतकर्यांना मेटाकुटीला आणलंय तर पशुपालकांच्या पशुधनावरही काळाचा घाला घातलाय. जालना जिल्ह्यात मागील दोन दिवसापासून झालेल्या वादळी वारा आणि पावसासह गारा कोसळल्याने सुमारे 72 पशुधन दगावलेत.
यामध्ये जालना तालुक्यातील 3 गायी भिंत पडून तर काही ठिकाणी विज पडून मयत झाल्यात. बदनापूर तालुक्यातील खडकवाडी येथे 1 गाय, आसरखेडा येथे 15 मेंढ्या गारपीटीमुळे मृत झाल्यात. तसेच उज्जैनपुरी येथे 15 मेंढ्या, 20 कोकरु, 9 बकर्या, 1 वासरु असे एकूण 45 पशुधन विज पडल्याने दगावलेत तर कडेगाव येथे 1 गाय विज पडून दगावलीय. जाफराबाद येथे 1 म्हैस, जाफराबाद तालुक्यातील रेपाळा 1, भारखेडा येथे 1 गाय असे जाफराबाद तालुक्यात 3 पशुधन दगावलेत. तसेच भोकरदन तालुक्यातील खंडाळा येथे 1 बैल दगावलाय. अंबड तालुक्यात देखील वडी लासूरा येथे 1 बैल दगावला असून घनसांवगी तालुक्यात घानेगाव येथे 1 म्हैस, मासेगाव येथे 1 बैल दगावलाय. असे जालना जिल्ह्यात एकूण 72 पशुधन दगावल्याने पशुपालकांवर देखील मोठं संकट कोसळलंय.