राज्यात सध्या अवकाळी पाऊस सुरु असून अनपेक्षित पडणार्या या अवकाळी पावसाचा मोठा फटका शेतकर्यांना बसलाय. जालना जिल्ह्यात अनेक ठिकाणी गारपीटसह पाऊस झाल्याने मोसंबी, द्राक्ष बागांसह इतर पिकांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. त्यामुळे शेतकरी वर्ग पुन्हा एकदा हवालदिल झाला असल्याने त्यांना पिकाची नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष भास्कर आबा दानवे पाटील यांनी शासनाकडे केलीय. या संदर्भात जिल्ह्यातील माहिती घेऊन त्यांनी प्रशासनातील तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी, मंडळ अधिकारी तलाठी, यांना आपत्कालीन परिस्थितीची कल्पना दिलीय. तसेच तातडीने पंचनामे करून शेतकर्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी याविषयी सूचना दिल्यात.
जिल्ह्यात कापूस, ज्वारी, गहू, हरभरा, तूर, कांदा, केळी यांसारखी रब्बी पीके वेगवेगळ्या स्थितीत आहेत. नुकसानीमुळे शेतकर्यांना वाढत्या खर्चाचा सामना करावा लागतोय, अशा परिस्थितीत शासनाच्या मदतीची आवश्यकता असते. अवकाळी पाऊसामुळे नुकसान झालेल्या क्षेत्रांचे तातडीने पंचनामे करून शेतकर्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, या संदर्भात आज तहसिलदार यांच्याशी संवाद साधून तत्काळ पंचनामे करण्याच्या सूचना भास्कर आबा दानवे यांनी दिल्यात. केंद्र व राज्य सरकार प्रत्येक संकट काळात शेतकरी राजाच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहते. हे कष्टकरी-शेतकर्यांचं सरकार आहे. शेतकरी बांधवांनी काळजी करु नये, कुठल्याही परिस्थितीत मदत मिळेल. यासाठी देशाचे केंद्रीय रेल्वेराज्यमंत्री ना. रावसाहेब पाटील दानवे यांच्या माध्यमातून आम्ही केंद्र व राज्य शासनाला नुकसानभरपाई विषयी मागणी करणार असल्याचे भास्कर आबा दानवे पाटील यांनी म्हटलंय.