जालना – महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था, मुंबई यांच्याकडून प्राप्त झालेल्या मार्गदर्शक सुचनेप्रमाणे जागतिक एड्स दिन म्हणून साजरा करण्यासाठी शुक्रवार दि.1 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 10 वाजता जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र पाटील यांच्या शुभ हस्ते जनजागृतीपर रॅलीला हिरवी झेंडी दाखवून जिल्हा रुग्णालय जालना येथून मार्गस्थ करण्यात आले.
प्रभात फेरीच्या उद्घाटनाप्रसंगी अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एन. जी. पवार, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मेश्राम, नोडल अधिकारी डॉ. प्रशांत बांदल, वैद्यकिय अधिक्षक डॉ. राजेंद्र गायके, क्षयरोग अधिकारी डॉ. रमेश काकड, नर्सिंग स्कुल प्राचार्य श्रीमती जाधव, वरीष्ठ वैद्यकिय अधिकारी/जिल्हा कार्यक्रम अधिकारी डॉ. मनिष सहानी, मनिष जाधव, यांच्यासह डापकु , एआरटी, आयसीटीसी कर्मचारी व प्रकल्प टिआय, प्रकल्प एलडब्लूएस व प्रकल्प विहान अशासकिय संस्था आयएसआरएसडी व सेतू चॅरीटेबल ट्रस्ट जालना येथील सर्व कर्मचारी आदी सर्वांची उपस्थिती होती.
रॅलीला उद्घाटनापूर्वी डॉ. राजेंद्र पाटील जिल्हा शल्य चिकित्सक यांनी उपस्थितांना शपथ देण्यात येऊन मार्गदर्शकीय माहितीमध्ये “Let Communities Leads” (समाजाचा पुढाकार व एचआयव्ही / एड्सचा समुळ नाश) म्हणजे समाजाच्या सहकार्याने व विविध उपक्रमाद्वारे एचआयव्ही कमी करणे हा होय. युवावर्गांनी एचआयव्ही/एड्स बाबत जास्तीत जास्त संवेदनशील राहुन कसे सुरक्षित राहाता येईल तसेच जास्तीत जास्त गर्भवती महिलांची, अतिजोखीम गटाची, स्थलांतरीत कामगारांची एचआयव्ही तपासणी करुन त्यांचे एचआयव्हीचे स्टेटस जाणून घेण्याबाबत आवाहन केले. व एआरटी औषधोपचारापासून दुरावलेले तसेच उपचारात खंड पडलेल्या लोंकाना या कार्यक्रमाशी जोडण्यात येईल असे सांगितले. असे प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.