पुण्यात मुंबई बेगळुरू महामार्गावर आज प्रवाशांना विचित्र अपघाताचा अनुभव आला. पुण्यातील भूमकर पुलावर साडेपाच शनिवारी पाच वाजण्याच्या सुमारास पाच वाहनांना ट्रकने धडक दिली. तर एका कारला तब्बल दीड किलो मीटर फरपटत नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या अपघातात चार जण जखमी असून त्यांना जवळील रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
अपघात मोठी जीवितहानी टळली असली तरी चार जण जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान चारही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. पोलिसांनी अपघातस्थळी दाखल होऊन पाहणी केली. तसेच या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.