बिहारच्या वैशाली जिल्ह्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. बिहारच्या वैशालीत जमिनीच्या वादातून दोन गटात जोरदार भांडण झाल्याची घटना घडली. या दोन्ही गटाचा वाद इतका टोकाला गेला की, एका गटाने दुसऱ्या गटातील ५ जणांना ट्रॅक्टरने चिरडल्याची घटना घडली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
नेमकं काय घडलं?
बिहारच्या वैशालीतील रुस्तमपूर पोलीस स्टेशनच्या कर्मापूर येथे शेत जमिनीच्या तुकड्यावरून दोन गटाचा वाद टोकाला पोहोचला. शेत जमिनीच्या तुकड्यावरून सुरु झालेल्या वादात दोन्ही गटाचे लोक आमनेसामने आले. दोन्ही गटातील लोकांनी एकमेकांवर लाठी-काठ्यांनी हल्ला करण्यास सुरुवात केली.
दोन्ही गटातील लोक या लाठीकाठीच्या हल्ल्यात जखमी झाले आहेत. तर या वादात एका गटातील व्यक्तीने दुसऱ्या गटातील लोकांना ट्रॅक्टरने चिरडलं.
या व्यक्तीने ट्रॅक्टरने चिरडल्याने पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. या पाच जणांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तर या घटनेत पाच जणांची प्रकृती चितांजनक असल्याचं सांगण्यात येत आहे.
जमिनीच्या तुकड्यावरून सुरू झालेल्या वादानंतर दोन्ही गटाने एकमेकांवर एफआयआर दाखल केली आहे. तर दोन्ही गटातील लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणाची पुढील कारवाई पोलिसांनी सुरु केली आहे.