दादर, मुंबई | 06 डिसेंबर 2023 : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज महापरिनिर्वाण दिन आहे. यंदाचा हा 67 वा महापरिनिर्वाण दिन आहे. त्यानिमित्त आंबेडकरी अनुयायींनी दादरच्या चैत्यभूमीवर गर्दी केली आहे. चैत्यभूमीवर अवघा भीमसागर लोटला आहे.
देशाच्या कानाकोपऱ्यातून आंबेडकरी अनुयायी आज मुंबईत आले आहेत. बाबासाहेबांच्या स्मृतींना हे अनुयायी अभिवादन करत आहेत. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनीही चैत्यभूमीवर जात आंबेडकरांना अभिवादन केलं. याच सोबत सगळ्याच पक्षाचे नेते आज चैत्यभूमीवर येत आहेत. बाबासाहेबांच्या स्मृतींसमोर ते नतमस्तक होत आहेत.