तुळजाभवानी मंदिर संस्थानने कुणालाही पाठिशी न घालता सीआयडी मार्फत चौकशी करावी अशी मागणी दागिन्यांची तपासणीसाठी नेमलेल्या मोजदाद समितीचे सदस्य तथा भोपे पुजारी मंडळाचे अध्यक्ष अमरराजे कदम यांनी साम टीव्हीशी बाेलताना केली आहे. तुळजापूर येथील तुळजाभवानी देवीचा एक किलो वजनाचा प्राचीन सोन्याचा मुकुट व इतर काही माैल्यवान दागिने गायब असल्याचा दागिने तपासणी समितीस आढळले. त्याबाबतचा अहवाल समितीने दोन महिन्यांपुर्वी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला आहे.
देवीच्या प्राचीन दागिन्यांची तपासणीसाठी जिल्हाधिकारी यांनी 16 सदस्यांची समीती स्थापन करण्यात आली होती. या समीतीने तपासणी केल्यानंतर जिल्हाधिकारी यांना सादर केलेल्या अहवालातून देवीच्या मंदीरातुन वेगवेगळ्या सात डब्यामधील शेकडो वर्षाचा इतिहास असलेले दुर्मिळ आणि मौल्यवान दागिने गायब असल्याचे समोर आले आहे.
हा अहवाल देऊन ही अद्याप कोणतीही कारवाई झाली नाही. त्यामुळे मंदिर संस्थानने कोणालाही पाठीशी न घालता सीआयडी मार्फत चौकशी करावी व कारवाई करावी अशी मागणी मोजदाद समीतीचे सदस्य तथा भोपे पुजारी मंडळाचे अध्यक्ष अमरराजे कदम यांनी साम टीव्हीशी बाेलताना केली.