अंबड -घनसावंगी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या उसाला योग्य मोबदला देण्यात समृद्धी साखर कारखाना मराठवाड्यात आघाडीवर राहिला. गळीत हंगाम २०२२-२३ मध्ये समृद्धी कारखान्याने गाळप झालेल्या शेतकऱ्यांच्या उसाला एफआरपी पेक्षा ११० रुपये अधिक भाव देत २ हजार ८०० रुपये प्रतीटन प्रमाणे अंतिम बिल दिले. दरम्यान गाळप हंगाम २०२३-२४ मध्ये समृद्धी साखर कारखान्यात गाळप होणाऱ्या शेतकऱ्यांच्या उसाला कारखान्याचे चेअरमन सतीश घाटगे व व्हाईस चेअरमन महेंद्र मेठी यांनी पहिली उचल (हप्ता ) २८०० रुपये प्रती मे. टन प्रमाणे देण्याचे बुधवारी जाहीर केले आहे. समृद्धी साखर कारखान्याकडून उच्चांकी दर मिळणार असल्याने शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला करत समृद्धी साखर कारखान्याचे चेअरमन सतीश घाटगे व व्हाईस चेअरमन महेंद्र मेठी यांचे आभार मानले आहे.
समृद्धी साखर कारखाना हा सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या विश्वासावर उभा असून सर्वसामान्य शेतकऱ्यांचा कारखाना म्हणूनच तो चालविल्या जातो. याचा आम्हाला अभिमान आहे. मागील गाळप हंगामात शेतकऱ्यांच्या उसाला २८०० रुपये प्रती मेट्रिक टन असा दर देऊन संपूर्ण बिल वितरीत करण्यात आले आहे. गाळप हंगाम २०२३ -२४ मध्येही शेतकऱ्यांच्या उसाला उच्चांकी दर देण्याचा प्रयत्न कारखाना करणार आहे. यंदाच्या हंगामात पहिला हप्ता २८०० रुपये प्रती मेट्रिक टन प्रमाणे देण्यात येणार आहे.
-सतीश घाटगे, चेअरमन समृद्धी साखर कारखाना