जालना – शहरात कॉलेज रोडवरील सोमेश रेसिडेन्सी येथील रहिवासी सुशीलकुमार शर्मा यांच्या घरात दिवसाढवळ्या घुसून महिलांना पिस्तूल व लोखंडी रॉडचा भाग दाखवून दागिने व रोख रक्कम लुटून नेल्याची अत्यंत सनसनाटी घटना घडली. या घटनेमुळे शहरात सर्वत्र एकच खळबळ उडाली असून संबंधित कुटुंब अत्यंत भयभीत झाले.
सदरील घटनेची माहिती कळल्यानंतर शिवसेना जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर यांनी संबंधीत सुशिलकुमार शर्मा यांच्या घरी जाऊन घटनेची व्यवस्थित माहिती घेतली. कुटुंबीयांची आस्थेवाईकपणे विचारपूस करून भयभीत झालेल्या कुटुंबीयांना धीर देताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष आपल्या पाठीशी ठाम असल्याचे सांगितले. तसेच पोलीस अधिकार्यांशी संपर्क करून सदरील गुन्हेगारांचा तात्काळ शोध घेऊन त्यांना अटक करून कडक शासन करण्याची मागणी केली. ज्यामुळे सामान्य नागरिकांच्या मनात निर्माण झालेली भीती नाहीसी होईल असे जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर म्हणाले.